Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : औरंगाबादच्या पाचोडमध्ये विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या

उशीरापर्यंत घरी न परतल्याने कुुटुंबियांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली.

हबीबखान पठाण

पाचोड (जि.औरंगाबाद ) : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील पाचोड (ता.पैठण) येथील पन्नास वर्षीय व्यक्तीने सोमवारी (ता.१३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मिठ्ठु नारायण साबलकर असे त्या आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यासंबंधी अधिक माहिती अशी, पाचोड येथील मिठ्ठू साबलकर (वय ५०) हे सोमवारी (ता.१३) सकाळी कुणाला काही एक न सांगता घराबाहेर गेले. ते उशीरापर्यंत घरी न परतल्याने कुुटुंबियांनी त्यांची सर्वत्र शोधाशोध केली. दुपारी तीन वाजेच्या सुमारास गावातील काही नागरिक सुरेश भुमरे यांच्या विहीरीकडे काही गेले असता त्यांना मिठूठु साबलकर यांचा मृतदेह विहिरीत दिसुन आला. (Man End Himself After Jumping Into Well In Paithan Taluka Of Aurangabad)

त्यांनी या घटनेची माहिती गावातील नागरिकांना दिली असता गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोच या घटनेची माहीती पाचोड पोलिसांना मिळताच बीट जमादार संतोष चव्हाण, रविंद्र आंबेकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली.

पुढील तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT