Rape Crime news Sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद हादरले! सहा वर्षांच्या मुलीवर नराधमाने केला बलात्कार

पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच जमा झालेल्या लोकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

रामराव भराड

वाळूज (जि.औरंगाबाद) : घराजवळ खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीला शेजारी राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय नराधमाने त्याच्या खोलीत घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र वेदना असाहाय्य होत असल्याने ती जोरात ओरडल्याने शेजारी धावले. ही अत्यंत खबळबळ जनक घटना वाळूज (Waluj) परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे मंगळवारी (ता.२८) रोजी भरदुपारी घडली. वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथील एका वाड्यात (Aurangabad) दहा ते बारा जण भाड्याने राहतात. पंचेचाळीस वर्षीय नराधम आरोपी तुकाराम परसराम जाधव हा पीडित चिमुकलीच्या घराजवळ भाड्याच्या खोलीत राहतो. तो खासगी व्यवसाय करतो. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सहा वर्षीय चिमुकली घराजवळ खेळत होती. तिला उचलून घरात घेऊन जाऊन दरवाजा व खिडक्या बंद केल्या. (man misbehave with minor girl in waluj area aurangabad crime)

चिमुकलीवर तो लैंगिक अत्याचार करु लागला. मात्र वेदना सहन होत नसल्याने ती जोरजोरात ओरडत होती. तिच्या ओरडण्याचा आवाज आल्याने तिची आई व शेजारील पाच ते सहा जण जमा झाले. हा आवाज जाधव याच्या खोलीमधून येत होता. परंतु त्याच्या खोलीचा दरवाजा व खिडक्या बंद होत्या. घरासमोर जमा झालेल्या लोकांनी लाथा मारुन जाधव याचा दरवाजा उघडला. त्यावेळी तेथे नराधम जाधव हा मुलीवर लैंगिक अत्याचार करताना दिसून आला. आईने जमा झालेल्या लोकांच्या मदतीने चिमकलीची त्याच्या तावडीतून सुटका करत घरी नेले. मात्र पीडित चिमुकली ही अत्यंत बेदरलेली होती.

दरम्यान आपण पकडले जाऊ म्हणून तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच जमा झालेल्या लोकांनी नराधम जाधव यास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात नराधम तुकाराम परसराम जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला ३१ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन इंगोले हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात सलग दोन दिवस घसरण, आजचे भाव काय?

१३५च्या स्पीडनं स्विफ्टची ट्रकला मागून धडक, अख्खं कुटुंब संपलं; पाच जणांचा जागीच मृत्यू

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाला पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

बुमराला अचानक विश्रांती का? अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCI चा मोठा मास्टरप्लॅन समोर!

SCROLL FOR NEXT