Case registered against 18 people including girl in murder of a young man over love affair rak94 
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime News : दारात चिठ्ठी टाकल्याचा वाद शिगेला! शेजाऱ्यांनी मारहाण करुन तरुणाला विहिरीत फेकलं; १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

रोहित कणसे

पिशोर (जि. छत्रपती संभाजीनगर) : दोघांच्या प्रेम प्रकरणाची माहिती घरापर्यंत गेली. यातून मुलींच्या नातेवाइकांनी मुलास मारहाण करून त्यास विहिरीत फेकून दिल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात समोर आला आहे. ही घटना सोमवारी (ता.७) कन्नड तालुक्यातील खातखेडा येथे घडली. या प्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात १८ जणांविरुद्ध मंगळवारी (ता.८) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नारायण रतन पवार (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय झालं?

खातखेडा (ता. कन्नड) येथील बामणवाडा वस्ती येथे मृत तरुण नारायण व आरोपी यांची घरे समोरासमोर आहेत. रविवारी (ता. ६) एका आठवर्षीय मुलाने मृत नारायण राहत असलेल्या घराच्या दरवाजासमोर एक चिठ्ठी टाकली. ही चिठ्ठी घरासमोरील मुलीने दिली असल्याची माहिती नारायणने त्याच्या आई-वडील, भाऊ व बहिणीला दिली.

नारायणच्या आई व वडिलांनी सोमवारी सकाळी मुलीच्या आई-वडिलांना घरी बोलावून चिठ्ठीविषयी कल्पना दिली. मुलीच्या आई-वडिलांनी मुलीला या चिठ्ठीविषयी विचारणा केली असता तिने ही चिठ्ठी लिहिली नसल्याचे व उलट नारायणच माझ्या मागे लागला असल्याचे सांगितले. नंतर मुलीच्या घरच्यांनी नारायणला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली.

मृत तरुणाच्या आई-वडिलांनी मध्यस्ती करून भांडण मिटविले. परंतु, पुन्हा संध्याकाळी मुलीचे वडील व इतर नातेवाईक नारायणच्या घरी आले. नारायणला बेदम मारहाण केली.

यानंतर प्रदीप काकुळते, राजेंद्र काकुळते, सचिन काकुळते, सचिन निकम यांनी नारायणला उचलून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीत टाकून दिले. घटनेची माहिती मिळताच पिशोरचे सहायक पोलीस निरीक्षक कोमल शिंदे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. नारायणला विहिरीतून सोमवारी रात्री बाहेर काढून पिशोर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. मंगळवारी सकाळी मृताच्या नातेवाइकांनी पिशोर पोलिस ठाण्यासमोर आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ठिय्या दिला.

मृत नारायणचे वडील रतन नथ्थू पवार यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीसह, राजेंद्र नारायण काकुळते, शरद नारायण काकुळते, प्रदीप नारायण काकुळते, नारायण नामदेव काकुळते, सचिन कारभारी काकुळते, कारभारी नामदेव काकुळते, सचिन निकम, कांताबाई नारायण काकुळते, मंजुळा राजेंद्र काकुळते, स्वाती प्रवीण काकुळते, रेखा प्रदीप काकुळते, योगिता सचिन काकुळते, पूनम यतीन काकुळते, निमाबाई कारभारी काकुळते, सीमा सचिन काकुळते, प्रवीण नारायण काकुळते, यतीन कारभारी काकुळते (सर्व रा. खातखेडा) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

यातील सचिन निकम वगळता आठ पुरुष संशयित आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास सपोनि. कोमल शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT