Mangalsutra thefts Baap leka dhumakul Marathwada Crime sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : मंगळसूत्र चोऱ्यांमध्ये बाप-लेकाचा धुमाकूळ!

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गुन्हे

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : एखाद्या व्यवसाय दुसऱ्या पिढीकडे सोपविल्याची आपण अनेक उदाहरणे बघितली आहे. मात्र एका पित्याने घरफोड्या करून थकल्यानंतर चक्क मुलाला हाताशी धरून धूमस्टाइल मंगळसूत्र हिसकावण्याचा सपाटा लावल्याचे समोर आले आहे. बुलडाणा, औरंगाबाद, जालना, नगर, बीड आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यांत त्यांनी धुमाकूळ घातला असून तब्बल ४२ गुन्हे केल्याचे समोर आले आहे. यातील बापाला नुकतेच जवाहरनगर पोलिसांनी जालन्याहून ताब्यात घेतले. मात्र, त्याचा मुलगा फरार आहे. औरंगाबादेत हिसकावलेले सर्व मंगळसूत्र त्यांनी नगर जिल्ह्यात विक्री केले असून पोलिसांनी आतापर्यंत तीन गुन्ह्यातील दागिने जप्त केले आहेत.

शेख सलीम शेख अफजल (५२, रा. सैलानी ता. चिखली जि. बुलडाणा सध्या. रा. कासंबरी दर्गा पडेगाव) असे अटकेतील आरोपीच्या पित्याचे तर वसीम शेख असे पुत्राचे नाव आहे. ५ एप्रिलला मुलासोबत दुचाकीने शहरात आलेल्या सलीमने सिंधी कॉलनीत पुष्पाबाई गोकुलदास काल्डा (६४) या महिलेची तब्बल अडीच तोळ्यांची चेन हिसकावली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज जप्त केले होते. त्यात सलीम स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, सैलानी दर्गा येथे बस्तान मांडलेला सलीम व त्याच्या मुलाने औरंगाबादेत तब्बल नऊ गुन्हे केल्याचे उघडकीस आले.

२१ गुन्ह्यांची दिली कबुली

एप्रिल, सप्टेंबर अशा वेगवेगळ्या महिन्यात ते औरंगाबादला आल्याचे फुटेज प्राप्त झाले आहे. याशिवाय त्याने सोलापूरमध्ये २१ गुन्हे केल्याची कबुली दिली असून जालना, बुलडाणा, बीड व नगरमध्येही या बाप-लेकाने धुमाकूळ घातला होता. जालना पोलिसांनी अटक केलेल्या सलीमकडून त्यांनी १८ तोळे सोने जप्त केले आहे. हे सर्व सोने त्याने विक्री केले होते. पोलिसांनी सराफांकडून ही रिकव्हरी केली. तो सध्या औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात आहे. जिन्सी, सिटी चौक पोलिसांनी त्याच्याकडून पाच तोळे दागिने जप्त केले आहेत. सध्या तो जवाहरनगर पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक अजित दगडखैर, अंमलदार राजेश चव्हाण, जावेद पठाण, विजय वानखेडे यांच्या पथकाने नगरला जाऊन एक तोळ्याची चेन जप्त केली आहे. त्याला पुन्हा सिडको, क्रांती चौक आदी पोलिस अटक करणार आहेत अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT