sambaji nagar sakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation : आरक्षणासाठी पानवडोद बुद्रूक येथे ग्रामपंचायत सदस्यांचे राजीनामे

सेवा संस्थेच्या सदस्यांसह, दूध उत्पादक संस्था, तंटामुक्ती समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिले राजीनामे.

सचिन चोबे

सिल्लोड - तालुक्यातील पानवडोद बुद्रुक येथे मंगळवारी (ता.12) रोजी गावकर्‍यांनी सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.तसेच येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सर्व सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सर्व सदस्य, सिद्धेश्वर दूध उत्पादक संघ चेअरमन व सर्व सदस्य, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व सदस्य या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचे राजीनामे ग्रामसेवक यांचेकडे दिले.

मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ गावातील सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळीच आंदोलन करीत सामूहिक राजीनामे दिल्यामुळे याची मोठी चर्चा परिसरात सुरू झाली. विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायतीच्या राखीव जागेतील सदस्य यांनी सुद्धा मराठा आरक्षण समर्थनार्थ राजीनामे दिले.

यावेळी आंदोलकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. महाराष्ट्र सरकारच्या निषेधार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून त्यांची तिरडी जाळण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती.

सरपंच देणार गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामा.

येथील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असून, ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री भास्कर फुसे त्यांच्या पदाचा राजीनामा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती सरपंच पती भास्कर फुसे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT