manoj jarange Esakal
छत्रपती संभाजीनगर

Maratha Reservation: "२४ डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, लवकर टाईम बॉन्ड द्यावा"; मनोज जरांगे काय म्हणाले?

मराठा आरक्षण: २४ डिसेंबरच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे, लवकर टाईम बॉन्ड द्यावा; मनोज जरांगे काय म्हणाले?

Sandip Kapde

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सरकारला लिखित टाईम बॉन्ड मागितला आहे. सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुदतीवरुन मराठा समाज आणि सरकारमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने सांगितलं म्हणून त्यांना वेळ वाढवून दिला. त्यामुळे लवकर टाईम बॉन्ड द्यावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

आम्हाला २४ डिसेंबरच्या आतमध्ये मागणीनुसार मराठ्यांना आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे सरकारने वेगात काम करावे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालावी, अशी विनंती मनोज जरांगे यांनी केली.

मराठा समाजासोबत लिंगायत, मारवाडी, धनगर, माळी या समाजातील देखील कुणबी नोंदी आढळल्या यांना आरक्षण मिळावं का?, यावर मनोज जरांगे म्हणाले, नोंदी असतील तर आरक्षण द्यायला हवे. धनगर समाज एकत्र आला तर त्यांना लवकर न्याय मिळेल. परंतू भावनेच्या आहारी जाऊ नका, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. (Maratha Reservation Update)

महाराष्ट्रभर मुख्यमंत्र्यानी लक्ष घालून प्रमाणपत्र देण्याची गती वाढवावी. टाईम  बॉन्ड ठरला तो आपण तातडीने द्यावा. नोंदीचा काम वेगाने सुरू त्याचं कौतुक आहे, असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच सरकारने समीतीला बजेट कमी पडू देऊ नये, संध्याकाळपर्यंत निधी जाहीर करावा, असे नाही केल्यास आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देखील जरांगेंनी दिला आहे.

सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड थांबवावे आणि मराठा आरक्षणाकडे जास्त लक्ष द्यावे, सरकारने मराठा समाजाचे हीत आणि भावना लक्षात घ्यावे. मराठा समाजाच्या नेत्यांनी देखील लक्ष द्यावे, नाहीतर परीणाम शांततेत का होईना, पण ते दिसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.  (Latest Marathi News)

ओबीसी समाजाला जास्त निधी दिल्या जातो तसा निधी मराठा समाजाला देखील द्यावा, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. आम्हाला ओबीसीमध्ये घ्या मग तुम्ही आरक्षणाची टक्केवारी कितीही वाढवा. आरक्षण वाढवायचं गाजर दाखवून नका, असा इशारा देखील जरांगेंनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT