Aurangabad Rain : शाळा पाण्यात, पुस्तके गाळात! 
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad Rain : शाळा पाण्यात, पुस्तके गाळात!

शाळांमध्ये सोमवारी एकीकडे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत होता तर दुसरीकडे ढगफुटीसदृष्‍य पावसामुळे गोपाळपूर येथील जि.प. शाळेला पुराच्या पाण्याने वेढलेले होते

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : शाळांमध्ये सोमवारी एकीकडे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येत होता तर दुसरीकडे ढगफुटीसदृष्‍य पावसामुळे गोपाळपूर येथील जि.प. शाळेला पुराच्या पाण्याने वेढलेले होते. त्यामुळे शाळेत पाणी साचून शैक्षणिक साहित्य, पुस्तकांचे मोठे नुकसान झाले. परीणामी, विद्यार्थी शाळेत जाण्यास मुकले होते.

पुरामुळे शाळेतील शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले; तर विद्यार्थ्यांना वितरीत करण्यासाठी आणलेल्या नवीन पाठ्यपुस्तकांचा अक्षरशः चिखल झाला आहे. शाळेला संरक्षक भींत नसल्यामुळे पुराचे पाणी शाळेत शिरले. त्यामुळे प्रत्येक वर्गात तीन फूटापर्यंत, तर शाळेच्या मैदानावर सात फूटापर्यंत पाणी साठले होते. यात पाठ्यपुस्तके, वह्या, बेंच, खुर्च्या, फर्निचर वाहून गेले. वर्गातील फरशा उखडल्या, शाळेतील संगणक, पाणी स्वच्छतेचे प्युरीफायर, बॅटरी, इनव्हर्टर, विद्यार्थ्यांची खेळण्यांचे मोठे नुकसान झाले. या पुरासोबत वाहून आलेला गाळ, कचरा, भंगार साहित्याचा शाळेच्या आवारात खच पडला. जिल्हा परिषद प्रशासनाने याची दखल घेवून मदत करावी, अशी मागणी सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीने केली आहे.

पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शाळा भरविण्यात आली नाही. याबाबत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्यांनी पंचनामा केला आहे. याबाबतचा अहवाल गटशिक्षणाधिकारी यांना सादर केला आहे.

-अलका शुक्ला, मुख्याध्यापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यातील रस्त्यांवर गुंडगिरीचा माज; किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार करण्याचे प्रकार वाढले

Mumbai Rent Rules: मुंबईत भाडे करार नियमात बदल, ऑनलाइन नोंदणी बंधनकारक; नियम मोडल्यास 'इतका' दंड

ZP Election: कुस्त्यांच्या मैदानांवर भावी जिल्हा परिषद सदस्यांचा राजकीय रंग, कोल्हापूर जिल्ह्यात मिनी विधानसभेसाठी अनेकांनी ठोकळा अघोषीत शड्डू

Pune News: वधू एक, बायोडाटा अनेक! पुण्यात विवाह मंडळांकडून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update : महात्मा फुले रुग्णालयाच्या पुननिर्माणावरून श्रेयवाद

SCROLL FOR NEXT