Aurangabad : जायकवाडीसह मोठी आठ धरणे तुडुंब sakal News
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : जायकवाडीसह मोठी आठ धरणे तुडुंब

मराठवाड्यातील सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही मोठी धरणे शंभर टक्के भरली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यातील सिद्धेश्‍वर, विष्णुपुरी, निम्न दुधना, निम्न तेरणा, मांजरा, सीना कोळेगाव आणि मानार ही मोठी धरणे शंभर टक्के भरली असून जायकवाडी धरणाचीही शंभर टक्क्यांकडे वाटचाल सुरू आहे. निम्न दुधना वगळता सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठ्याची टक्केवारी ‘दलघमी’ मध्ये अशी : येलदरी ७९१.९९, सिद्धेश्‍वर ८०.९६, मानार १३८.२१, विष्णुपुरी ८०.७९, निम्न दुधना २४२.२०, माजलगाव ३०७.२०, मांजरा १७६.९६, पेनगंगा ९६२.१८, निम्न तेरणात ९१.२२, सीना कोळेगाव ८९.३५.

पैठणला गोदावरी नदीकाठाबाहेर पाणी

पैठण : येथील जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागरातील कालच्या रात्री पाणलोटक्षेत्रात पाण्याची मोठी आवक सुरु झाल्यामुळे नाथसागराचे सर्व २७ वक्र दरवाजे उघडण्यात आले. रात्री ११ वाजता धरण प्रशासनाने हा निर्णय घेतला. सध्या धरणात ९९.३४ टक्के पाणीसाठा आहे. दरम्यान, पाण्याची आवक कमी झाल्यामुळे गुरुवारी (ता.३०) सकाळी ११ वाजता २७ पैकी नऊ दरवाजे बंद करण्यात आले असून १८ दरवाजे सुरु ठेवण्यात आले आहे. गोदावरीच्या पात्रात सध्या पाणी पाणीच झाले असून दोन्ही काठाच्या बाहेर हे पाणी वेगाने आले आहे. वाढत्या पाणी परिस्थितीवर धरण व तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.

दृष्टिक्षेपात धरणातील साठा

धरणाचे नाव टक्केवारी विसर्ग सुरू (क्युसेक)

जायकवाडी ९९.३४ ३७७२८

निम्न दुधना १०० ००

येलदरी ९७.८९ २९५३

सिद्धेश्‍वर १०० ११३५८६

माजलगाव ९८.४६ २१९७२

मांजरा १०० ५२४२

पेनगंगा ९९.८० २७१२२

मानार १०० १७४७

निम्न तेरणा १०० ३८३५

विष्णुपुरी १०० २४९४९८

सीना कोळेगाव १०० ८३३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: वैजापूर पोस्टल मतमोजणीत भाजपाला सुरुवातीची आघाडी, दिनेश परदेशी पुढे

Kolhapur Election Result : कोल्हापूर जिल्ह्यात मतमोजणीला सुरूवात, कागलमध्ये निकालापूर्वी अभिनंदनाचे बॅनर लावल्याने तणाव; उत्कंठा शिगेला

जालन्यात काँग्रेस नेत्याच्या पुतण्यानं संपवलं आयुष्य, कारमध्ये गोळी झाडून घेतली

Epstein Files Missing : अमेरिकेत खळबळ! 'जेफ्री एपस्टाईन'शी संबंधित फाईल्स गायब; २४ तासांत ट्रम्पचा फोटोही डिलीट

Winter Depression Diet: हिवाळ्यात सतत उदास वाटतंय? ‘हे’ पदार्थ खाल्ल्यावर मूड अन् आरोग्य दोन्ही राहील हेल्दी

SCROLL FOR NEXT