छत्रपती संभाजीनगर

बाहेरील व्यक्तीस प्रवेश बंदी...गावोगावी लागले बोर्ड 

शेखलाल शेख

औरंगाबादः शहरासह ग्रामीण भागात कोरोनाची प्रचंड दहशत असून धास्तावलेल्या ग्रामस्थांनी अनोळखी व्यक्तींना गावात नो एन्ट्री केली आहे. शहरात, परजिल्ह्यात मोठ्या संख्येने कामाला, नोकरीला असलेल्या व्यक्ती कुटुंबासह आपल्या मुळ गावी परतल्या आहेत. मात्र यामुळे गावांमध्ये चांगलीच भीती असून या सर्वांना तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ज्या गावात कोरोनाचा संशयित आढळला आहे तेथे तर बाहेर व्यक्तीस प्रवेश बंदी असलेले फलकच गावाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे. गावात साधा सर्दी, ताप, खोकल्याचा रुग्ण जरी आढळला तरी गल्लीत धावपळ होतांना दिसतेय.

हेही वाचा- औरंगाबाद शहरात आता होणार कोरोना स्पेशल हाॅस्पीटल

नाव नोंदणी केल्या शिवाय प्रवेश नाही 

जे मुळचे गावाचे रहिवाशी आहेत अशांना गावात परतल्यावर ग्रामपंचायत मध्ये नाव नोंदणी करावी लागत आहे. शिवाय तपासणी केल्यावर पुढील पंधरा दिवस कुणाच्या संपर्कात न येण्याच्या सूचना केल्या जात आहे. शिवाय गावातील मंदीर, मशीद अशा धार्मिक स्थळावरुन ध्वनीक्षेपकाच्या माध्यमातून सूचना केल्या जात आहे. बाहेर गावातून कुणी येत असेल तर त्याची माहिती ग्रामपंचायत, पोलिस प्रशासनाला द्यावी असे सांगितले जात आहे. 

काही गावात टाकल्या काट्या, दगड 

गावात जाण्यासाठी मुख्य रस्त्यावर अनेक काटेरी झुडपे, दगड, लाकूड टाकले आहेत. तसेच येथे फलक सुद्धा लावण्यात आले आहे. बाहेरील व्यक्तींना गावात आता प्रवेश करणे अतिशय अवघड झाले आहे. पाहुणे जरी आले तरी त्यांना येथे अवघड झाले आह. 

कोरोना संशयिताने गोंधळ 

जेथे सर्दी, ताप खोकल्याचे रुग्ण आढळून येत आहे त्या गावात सुद्धा गोंधळ उडतांना दिसत आहे. या रुग्णाला थेट जिल्हा सामान्य रुग्णालयात तपासणीसाठी यावे लागत आहे. अशा रुग्णांना ग्रामस्थांकडून बाहेर न पडण्याच्या सक्त सूचना दिल्या जात आहे. 

हेही वाचा- गुड न्यूजः औरंगाबादेत 32 जणांचे अहवाल निगेटीव्ह

ग्रामस्थ आक्रमक 

प्रत्येक गावातील ग्रामस्थ सध्या बाहेरील व्यक्तींच्या बाबतीत अतिशय आक्रमक झाले आहे. यामध्ये पाहुण्यांसुद्धा सोडले जात नाही. त्यांना सुद्धा अडविले जात आहे. पुढील काही दिवस तरी अनोळखी व्यक्तींना गावात येऊ नये असे गावातील सगळ्यांना सांगितले असून काही जर लाठ्या, काठ्या घेऊन बसले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT