latur sakal
छत्रपती संभाजीनगर

Latur News :लातूरचा पारा सोळा अंशांवर

सात दिवसांत तापमानात घट; नागरिक अन् शेतीच्याही आरोग्यावर परिणाम

सकाळ वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे. तापमानात कमालीची घट झाली आहे. सध्या सरासरी पंधरा ते १६ डिग्रीसेल्सिअस तापमान किमान तापमान राहत आहे. तर कमाल पारा २५ च्या घरात आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील नागरीक गारठ्याचा अनुभव घेत आहेत. पावसाने उघडीप दिली असली तर थंडीचा जोर मात्र वाढू लागला आहे.

जिल्ह्यात डिसेंबरचा पहिला आठवडा थंडी घेवून आला आहे. जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस जिल्ह्यातील साठही महसूल मंडळात पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मात्र थंडी सुरु झाली आहे. गेल्या सात दिवसाच्या तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. सात दिवसाची आकडेवारी पाहिली तर किमान तापमान सरासरी १६.७५ अंश डिग्रीसेल्सिअस राहिले आहे.

तर कमाल तापमान २३.९४ अंश डिग्री सेल्सिअसवर राहिला आहे. आद्रर्ता सरासरी आरएच १ ही ७८.४ तर आरएच २ ही ५१.७१ राहिली आहे. तापमान कमी होत असल्याने लातूरकर थंडीचा अनुभव घेत असून गारठले आहेत. यातून नागरीकांना दिवसभर व रात्रीही उबदार कपड्यांचा वापर करावा लागत आहे.

यात ज्येष्ठ व लहान मुलांच्या आरोग्यावर मात्र अधिक परिणाम होताना दिसत आहे. तर दुसरीकडे सध्या रब्बी हंगाम सुरु आहे. या अशा वातावरणाचा रब्बी पिकांवरअधिक परिणाम होताना दिसत आहे. जिल्ह्यात रब्बीत हरभरा मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. अशा हवामानामुळे हरभऱ्यावर आळ्याचा प्रादूर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. हरबरा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकच्या औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. यात त्यांचे आर्थिक गणितही बिघडून चालले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Congress: चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा दुसरा गट स्थापन होणार; पक्षातला अंतर्गत वाद दिल्ली दरबारी

7 Minute 11 Second व्हायरल MMS पासून ते 'धुरंधर 2' सीन लीक क्लिपपर्यंत...जानेवारीमध्ये 'हे' टॉप 10 व्हिडिओ होते ट्रेंडिंग

"आमच्या प्रेमात ज्ञानदाने खूप सोसलं" होणाऱ्या नवऱ्याने सांगितली लव्हस्टोरी "आमच्या कास्ट वेगळ्या.."

Latest Marathi News Live Update: लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत स्थगित

Palghar Fire: पालघरमध्ये आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट! फर्निचर कंपनीला भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, Viral Video

SCROLL FOR NEXT