Sandipan Bhumare Sakal
छत्रपती संभाजीनगर

Sandipan Bhumare : विरोधक आले एकत्र पण..! मंत्री भुमरे अन् दानवेंचं गुफ्तगू; खैरेंना पाहताक्षणी मारली कलटी

दोघांनीही बराच वेळ गप्पा मारल्या पण वरिष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरेंना बघून दोघेही गायब झाले

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वृत्तवाहिन्यांवर मोठ्या त्वेशाने बोलत असतात. मात्र, समोरासमोर आल्यावर त्यांच्यात गप्पा होतात. लोकही या गप्पा एन्जॉय करतात, ते क्षण कॅमेऱ्यात टिपतात. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) टीव्ही सेंटर चौकातील पुतळ्याला अभिवादनासाठी आले होते.

त्यावेळी पालकमंत्री तथा रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी बऱ्याचवेळ गुफ्तगू केले. मात्र, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पाहताच, पालकमंत्र्यांनी कलटी मारल्याचे पहायला मिळाले!

जाधववाडी चौकातील बुलंद छावा युवा संघटनेच्या व्यासपीठावर पालकमंत्री संदीपान भुमरे चर्चा करत बसले होते. तेवढ्यात, अंबादास दानवे यांना भुमरे यांच्या शेजारची खुर्ची रिकामी करुन दिली. दानवे देखील भुमरेंच्या शेजारी बसले. वेळ मिळताच भुमरेंनी इशारा करत दानवेंशी बोलायला सुरवात केली. दानवेंच्या फेट्याच्या तुऱ्याच्या आडून भुमरेंनी बरेच हास्यविनोद केले. त्याला दानवेंनीही दाद दिली. बराचवेळ दोघात गुफ्तगू झाले.

स्वागतानंतर शोभायात्रेला सुरवात झाली. शोभायात्रेत भुमरे आणि दानवे काहीवेळ चालल्यानंतर दानवेंना गराडा पडला. ते तिथेच बोलत बसले. बराचवेळ भुमरे ताटकळले. त्यानंतर दानवे वाहनात बसून टीव्ही सेंटर चौकातील व्यासपीठावर जाऊन बसले. बऱ्याचवेळानंतर दानवेंची वाट पाहताना मागे पाहताच, माजी खासदार चंद्रकांत खैरे दिसले.

खैरेंना पाहताच, भुमरेंनी अभिजीत देशमुख यांच्या कानात काहीतर सांगत तिथून कलटी मारली. शोभायात्रा पुतळ्याजवळ पोचल्यानंतर खैरेंना अभिवादनासाठी बोलवायला किशोर नागरे आले तर, थांब... त्याला जाऊ दे तिथून, म्हणत शेवटी खैरेंनीही भुमरेंच्या समोरासमोर येणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT