Maharashtra Band In Aurangabad esakal
छत्रपती संभाजीनगर

महाविकास आघाडीच्या बंदला औरंगाबादेत संमिश्र प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी (ता.११) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने बंद पुकारण्यात आला आहे. औरंगाबादेत या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळी क्रांती चौकापासून ते शहागंज येथील महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत महाविकास आघाडीच्या शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) आणि काँग्रेसच्या (Congress Party) वतीने पदयात्रा (Maharashtra Band) काढण्यात आली. पत्रयात्रेच्या माध्यमातून त्यांनी व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनी त्यांना प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद केली. थोड्या वेळानंतर पुन्हा दुकाने सुरु करुन पूर्ववत व्यवहार सुरु केले. त्यानंतर क्रांती चौकात महाविकास आघाडीचे (Aurangabad) नेते एकत्र आले. येथे निषेध सभा घेण्यात आली. लखीमपूर खेरी येथील घटनेचा तसेच केंद्र सरकार व उत्तर प्रदेश सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. केंद्र सरकार शेतकरीविरोधी असून ते भांडवलदारांचे हित जोपासणारे असल्याचा आरोप करत हे लोकांना कळावे या उद्देशाने आजच्या बंदचे आयोजन केल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आजचा बंद पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला. सभेच्या शेवटी लखीमपूर खेरी घटनेतील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्य़क्ष कैलास पाटील, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड, कदिर मौलाना, विजयराज साळवी, हिशाम उस्मानी, विलास औताडे, प्रकाश मुगदिया, सूर्यकांत दगाडे, कांता गाडे, नंदकुमार घोडले, नामदेवराव पवार, भाऊसाहेब जगताप आदी उपस्थित होते.

कार्यकर्त्यांना व्यापाऱ्यांचा विरोध

औरंगपूऱ्यात बंदचे आवाहन करणाऱ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना व्यापाऱ्यांनी विरोध केला. औरंगपुरा येथील महात्मा फुले पुतळ्यापासून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते बंदचे आवाहन करत निघाले होते. यावेळी औरंगपूरा येथे काही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास विरोध दर्शवला. यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. व्यापारी व पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT