sambhajhi nagar  sakal
छत्रपती संभाजीनगर

Sambhaji Nagar : आमदार बंब यांचा युवक क्रांतिवीर पुरस्काराने सन्मान

मुंबई वाशी येथे पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीतर्फे गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना कै.उत्तमराव पवार स्मृती युवक क्रांतिवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

लासूर स्टेशन : मुंबई वाशी येथे पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकादमीतर्फे गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना कै.उत्तमराव पवार स्मृती युवक क्रांतिवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तालुक्यात प्रभावीपणे राबविलेली गंगापूर उपसा जलसिंचन योजना, जलजीवन मिशन योजना, तसेच नदी, नाले खोलीकरणासह केलेली विकास कामे आणि वैयक्तीक लाभार्थ्यांना दिलेला लाभ याची दखल घेऊन त्यांना राजकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल यंदाचा ९ वा पुरस्कार देण्यात आला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पालकमंत्री गणेश नाईक, आमदार नीलेश लंके, लक्ष्मीकांत पारनेरकर, राहुल पाटील, शेखर चरेगावकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. पूर्णवाद पॉलिटिकल अकादमीचा पुरस्कार आयुष्यातील मौल्यवान क्षण आहे. हा सन्मान माझा नसून मतदार जनतेचा आहे. मतदार संघातील नागरिकांनी दिलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची ही पावती आहे.

— प्रशांत बंब, आमदार, गंगापूर-खुलताबाद मतदार संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

Mumbai Indians च्या संघाने नवीन प्रशिक्षक जाहीर केला; २०१० पासून संघासोबत असलेल्या खेळाडूला केले बाय बाय...

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा भाजपवर आरोप; “मतचोरीच्या मुद्द्यावरून माघार घेणार नाही”

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT