गुन्हे 
छत्रपती संभाजीनगर

आईने मिळविला न्याय, मुलाच्या मारेकऱ्यांवर गुन्हे दाखल

सुषेन जाधव

औरंगाबाद : आधीच नवऱ्यापासून घटस्फोट झालेला, पदरात दोन मुले. लेकरांच्या भविष्यासाठी घरकाम करत संसाराचा गाडा हाकत असतानाच मोठ्या मुलाचा तलावात बुडून मृत्यू झाला. मात्र, जुन्या भांडणातून त्याला बुडवून मारल्याचे समजताच तिने थेट न्यायालयात धाव घेत, या प्रकरणी तक्रार दिली. वर्षभरानंतर न्यायालयाच्या आदेशाने ‘ती’च्या मुलाला बुडवून मारणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुलाच्या मृत्यूच्या दुःखातून सावरत तिने हिमतीने न्याय मिळविला. मात्र, अजूनही तिची लढाई संपलेली नाही. प्रतिभा शिंदे असे त्या महिलेचे नाव असून रोहन शिंदे (११) असे त्या मृत मुलाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रतिभा यांचा चार वर्षापूर्वी कायदेशीर घटस्फोट झाल्यापासून दोन्ही मुलांसोबत (रोहन, वय ११ वर्षे) आणि (यशराज वय ९ वर्षे) विटखेडा Aurangabad भागात राहतात. २५ ऑगस्ट २०२० रोजी रोहन मित्रांसोबत वाल्मी Walmi तलावात पोहायला गेल्यानंतर बुडाला. त्याला अग्निशामन विभागाने पाण्यातून बाहेर काढून घाटीत दाखल केले असता, तो मृत झाला होता.mother get justice after her son killing in aurangabad glp88

दुसऱ्या दिवशी प्रतिभा यांना मुलास बुडवून मारल्याचे समजले. रोहन हा वाल्मि तलावात पोहण्यास गेला असता, अक्षय परमेश्वर अवचरमल याने जुन्या भांडणातून पुन्हा रोहनशी वाद घातला आणि रोहनला हाताला धरुन तलावात बुडविले, रोहनवर येण्याचा प्रयत्न करत असताना पुन्हा त्याला पाण्यात ढकलले. तसेच अवधूत जगदाळे, नितीन सपकाळ यांनी रोहनला पाण्यात बुडविले, ही घटना घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणातील संशयित अक्षय अवचरमल, अवधूत जगदाळे, नितीन सपकाळ, रोशन लहाने आणि बेबी (पूर्ण नाव नाही) (सर्व रा. विटखेडा) या पाच जणांविरोधात प्रतिभा यांनी पोलिसांत तक्रार अर्ज दिला असता, प्रतिभा यांना शिवीगाळ करुन धमकीही दिली होती. मात्र, त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वरील पाच संशयितांविरोधात सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कराळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Board Exam: बारावीची परीक्षा आठ, तर दहावीची १५ फेब्रुवारीपासून;राज्य मंडळाचे अंतिम वेळापत्रक जाहीर

Thane Crime: धक्कादायक! २० दिवसांच्या बाळाची विक्री, अडीच लाखांना सौदा; जन्मदात्या आईकडून घेतलं अन् रत्नागिरीत विकलं

Sonia Gandhi: आणीबाणीचा निर्णय चुकीचाच होता; सोनिया गांधी यांचे मत; इंदिरा गांधींनाही जाणीव झाली होती

Latest Marathi News Live Update: मालाडमध्ये बाल लैंगिक शोषणाच्या प्रकरणी ४९ वर्षीय आरोपीला अटक

Space Data Center: अंतराळात डेटा सेंटर... केगावच्या माळरानात तीन विद्यार्थ्यांचा प्रयोग! ; २५.७ किलोमीटर उंचीवर बलूनमधून पाठविला संगणक; उणे ५५ अंशांतही एआयची यशस्वी चाचणी

SCROLL FOR NEXT