mpsc exam in Aurangabad 
छत्रपती संभाजीनगर

MPSC Exam: सहा कोरोनाबाधितांनीही दिली परीक्षा; ३२ टक्के उमेदवारांची दांडी

अतुल पाटील

औरंगाबाद: महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा पूर्वपरीक्षा - २०२० रविवारी (ता.२१) झाली. येथील केंद्रात १९ हजार ६५६ उमेदवार परीक्षा देणार होते. त्यातील ६ हजार ३०० उमेदवारांनी दांडी मारली. सहा कोरोनाबाधितांनीही केंद्रावर येऊन परीक्षा दिली. शहरात विकेंड लॉकडाउन असल्याने उमेदवारांसाठी परीक्षा केंद्रापर्यंत सिटी बस चालवल्याने अनेकांची गैरसोय टळली. तर काही संघटना, संस्थांनी जेवण, खिचडीची सोय केली होती. 

औरंगाबाद जिल्‍ह्यात ५९ शाळा, महाविद्यालयांत परीक्षार्थींची व्यवस्था होती. पहिल्या सत्रात सकाळी १० ते १२ च्या दरम्यान परीक्षा झाली. त्यावेळी १९ हजार ६५६ पैकी १३ हजार ३४६ उमेदवारांनी परीक्षा दिली. यात ६३०० म्हणजे ३२.०७ टक्के उमेदवार गैरहजर होते. दुपारचे सत्र तीन ते पाचदरम्यान होते. यात १३ हजार ६२७ उमेदवारांनी हजेरी लावली. यात ६ हजार १९ म्हणजे ३०.६४ टक्के उमेदवार गैरहजर होते. पहिल्या सत्रापेक्षा दुसऱ्या सत्राला २८१ उमेदवारांची अधिक उपस्थिती होती. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच केंद्रांवर नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात आली. काहीं केंद्राबाहेर सर्वांना रांगेत उभे करून एकत्रित सूचना देण्यात आल्या. काही केंद्रांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनीही भेटी दिल्या. परीक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना आणि पालकांना त्रास होऊ नये, यासाठी लॉकडाउनमध्येही सूट होती. वाहतुकीसाठी सिटी बसने पुढाकार घेतल्याने उमेदवारांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा बसला. 

कोरोनाबाधित उमेदवार केंद्रावर- 
औरंगपुरा येथील सरस्वती भुवन महाविद्यालयात कोरोनाबाधित परीक्षार्थी सकाळी रुग्णवाहिकेतून हजर झाला. रुग्णवाहिकेतून उतरून तो महाविद्यालयासमोर उभा राहिला. तुमची व्यवस्था सरस्वती भुवन शाळेत केल्याचे प्रशासनाने त्यांना सांगितले. पीपीई कीट घालून आलेला हा परीक्षार्थी हातात पाण्याची बाटली घेऊन गेटवरूनच स्वतंत्र परीक्षा खोलीपर्यंत गेला. पीपीई किट घालून आलेला परीक्षार्थी पाहून इतर सहकारी थोडे दचकले. इतर परीक्षार्थीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेताना दिसले.

जेवणाची, नाश्‍त्याची सोय-
विकेंड लॉकडाउनमुळे हॉटेल्स बंद असल्याने रविवारी परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जनकल्याण समितीतर्फे शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, स्वामी विवेकानंद महाविद्यालय, पीईएस महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालय, शिवछत्रपती महाविद्यालय, संत मीरा विद्यालय या परीक्षा केंद्रांवर फूड पॅकेट्स वाटप करण्यात आले. महिला कन्या महाविद्यालयात परीक्षार्थी मुलींसाठी तर मुकुल मंदिर शाळेत परीक्षार्थींसाठी जेवणाची सोय केली होती. काही केंद्रांवर अशी सोय नसल्याने विद्यार्थ्यांना दिवसभर उपाशी राहावे लागले. 

स्मार्ट सिटी बस सेवेत- 
परीक्षार्थींची अडचण होऊ नये, म्हणून प्रशासनाकडून स्मार्ट सिटी बससेवा सुरू ठेवली होती. शहरातील प्रमुख १७ मार्गांवर बससेवा सकाळी सात ते नऊ व सायंकाळी पाच ते सातपर्यंत सुरू होती. उमेदवारांच्या परतीच्या सोयीसाठी काही केंद्रांवर बस थांबून होत्या. काही विद्यार्थ्यांना बससेवा सुरू असल्याचे माहीत नसल्याने त्यांना पायपीट करावी लागली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT