mahavitran.jpg
mahavitran.jpg 
छत्रपती संभाजीनगर

महावितरणच्या अभियंत्यांमध्ये प्रचंड असंतोष ! संघटनेने दिला इशारा ! 

अनिलकुमार जमधडे

औरंगाबाद : महावितरणमध्ये विनंती बदल्या कराव्यात, अनिवार्य रिक्त पदाची संकल्पना रद्द करावी या मागण्यांसाठी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या विरोधात सबॉर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशनने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 

राज्यभरात कोविड-१९ सारख्या महामारीने अक्षरशः थैमान घातलेले आहे. या कठीण परिस्थितीमध्ये सर्व अभियंते कर्मचारी अखंडितपणे वीजपुरवठा करण्याचे काम करीत आहेत. अशा काळात काही अभियंते तर कर्तव्य बजावत असतांना कोरोन ग्रस्त झाले असून ,काही अभियंत्यांचा दुर्दैवीरित्या कोविड मुळे अंत झाला आहे. अशी आणीबाणीची परिस्थिती असतांना सुद्धा सर्व अभियंते व एस ई ए संघटना प्रशासनास प्रत्येक गोष्टीत सर्वोतोपरी सहकार्य करीत आहेत. 

मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असून त्यामुळे अभियंत्यांचे प्रचंड नाराजी आहे. शासनाच्या आदेशानुसार १५ टक्के बदल्यांचे परिपत्रक काढल्यानंतरही महावितरणने कनिष्ठ अभियंते व सहाय्यक अभियंत्यांच्या बदल्या केल्या नाहीत. उलट अनिवार्य रिक्त पदे रिक्त ठेवण्याची अफलातून संकल्पना राबवली आहे. त्यामुळे रोष निर्माण झाला असून, या विरोधात असोसिएशन राज्यव्यापी आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याची माहिती मराठवाड्याचे प्रादेशिक सचिव अविनाश चव्हाण यांनी दिली.

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT