MSEB Reward Scheme for Electricity Consumers sakal
छत्रपती संभाजीनगर

वेळेवर वीजबिल भरा अन् बक्षीसही मिळवा!

मराठवाड्यातील घरगुती ग्राहकांसाठी महावितरणची योजना

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - वीजबिल भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि दर महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी, या उद्देशाने महावितरणने औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी बक्षीस योजना आणली आहे. ता. एक जूनपासून या योजनेत दर महिन्याला बक्षिसे जिंकण्याची संधी महावितरणने उपलब्ध करून दिली आहे.

घरगुती ग्राहकांनी वीजबिल भरण्यास स्वत:हून पुढाकार घ्यावा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला बिल भरण्याची सवय लागावी यासाठी सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून ही बक्षीस योजना सुरू होत आहे. दरमहा बिल तयार झाल्याच्या सात दिवसांत बिल भरल्यास जवळपास एक टक्के तत्पर देयक भरणा सूट मिळते. तसेच ऑनलाइन बिल भरल्यास ५०० रुपयांच्या मर्यादेत ०.२५ टक्के सूट महावितरणतर्फे देण्यात येत आहे. आधीच उपलब्ध असलेल्या या सवलतींसोबतच या योजनेत भेटवस्तू स्वरूपात विविध बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी ग्राहकांना मिळत आहे.

या योजनेत थकबाकीसह दरमहा संपूर्ण वीजबिल भरणाऱ्या घरगुती वीजग्राहकांमधून सोडत पद्धतीने बक्षिसे काढण्यात येणार आहेत. बिल भरण्याच्या अंतिम मुदतीच्या आत सर्व बिले भरावी लागतील. महावितरणचे कर्मचारी वगळता मराठवाड्यातील सर्व घरगुती ग्राहकांसाठी ही योजना आहे. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला सोडत काढण्यात येईल. दर महिन्याला मराठवाड्यातील १०१ उपविभागातून १ हजार रुपयांपर्यंतची प्रत्येकी २ बक्षिसे वस्तू स्वरूपात दिली जाणार आहेत. त्यातील एक बक्षीस हे तत्पर देयक भरणा करणाऱ्या ग्राहकास व दुसरे बक्षीस अंतिम मुदतीच्या आत बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी आहे.

दरमहा २२ विभागांतून प्रत्येकी एका मिक्सर ग्राइंडर किंवा त्या समकक्ष वस्तू, ९ मंडळांतून प्रत्येकी एक मोबाईल हँडसेट किंवा टॅब्लेट, ३ परिमंडलांतून प्रत्येकी एक एलईडी टीव्हीचे बक्षीस दिले जाणार आहे. तर प्रादेशिक कार्यालय स्तरावर ऑनलाइन बिल भरणाऱ्या ग्राहकांमधून प्रत्येक महिन्याला रेफ्रिजरेटरचे एक विशेष बक्षीस आहे. प्रादेशिक कार्यालयात स्तरावरच इलेक्ट्रिक स्कूटरचे दरमहा बंपर बक्षीस आहे. १ जून ते ३० ऑगस्टपर्यंत सुरू असलेल्या या योजनेचा मराठवाड्यातील सर्व घरगुती वीज ग्राहकांनी दरमहा वीजबिल भरून लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT