MSEDCL to purchase 33 lakh new meters 
छत्रपती संभाजीनगर

महावितरण खरेदी करणार ३३ लाख नवीन मीटर

टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू : सध्या मीटरचा तुटवडा नसल्याचे अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - महावितरणकडे सध्या नवीन वीजमीटरचा कोणताही तुटवडा नाही. येत्या काळात तब्बल ३२ लाख ८० हजार नवीन वीजमीटर लवकरच टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

महावितरणने मीटर उपलब्धतेसाठी तातडीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून येत्या सप्टेंबर २०२२ पर्यंत १५ लाख नवीन सिंगल फेज वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश देण्यात आला आहे. गेल्या एप्रिल अखेर १ लाख ३१ हजार ८०२ वीजमीटर क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध होते, तर मे महिन्यापासून आतापर्यंत आणखी २ लाख ५० हजार नवीन मीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. सोबतच कार्यादेश दिलेल्या ७५ हजार नवीन थ्री फेजच्या मीटरचा पुरवठाही सुरू झाला आहे.

कोरोनाच्या संसर्ग काळामध्ये विविध कंपन्यांकडून वीजमीटरचे उत्पादन थंडावले होते. यावर्षीच्या सुरवातीपासून मीटर उत्पादनाला नियमित सुरवात झाली आहे. महावितरणने निविदा अंतर्गत पुरवठादारांना तब्बल १५ लाख नवीन वीजमीटरच्या पुरवठ्याचा कार्यादेश गेल्या एप्रिल महिन्यात देण्यात आला आहे. त्यातून एप्रिलपासून आतापर्यंत २ लाख ६० हजारांवर मीटर उपलब्ध झाले आहेत. याशिवाय येत्या जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्रत्येकी ३ लाख २५ हजार नवीन वीजमीटर उपलब्ध होणार आहेत. सोबतच कार्यादेशाप्रमाणे ७५ हजार नवीन थ्रीफेजच्या मीटरचा पुरवठा सुरू झाला आहे.

महावितरणकडून सिंगल फेजच्या १२ लाख ८० हजार नवीन स्मार्ट मीटरच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. तर पुढील काळात मीटरची वाढती मागणी पाहता आणखी २० लाख सिंगल फेज मीटर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नवीन वीजजोडणी व नादुरुस्त मीटर बदलण्यासाठी कार्यालयांकडून मीटर उपलब्ध होत नसल्यास महावितरणचे संबंधित कार्यकारी अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांच्याशी ग्राहकांनी थेट संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT