महावितरण-नोकरीची-संधी.jpg sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : वसुली मोहीम शेतकऱ्यांच्या मुळावर

थकीत बिले भरल्याशिवाय जळालेली रोहित्रे न देण्याचा महावितरणचा पवित्रा

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड : शेतशिवारात विद्युत पुरवठा होत असलेल्या थ्री-फेज रोहित्रांचा प्रश्न गंभीर बनला आहे. जळालेले थ्री-फेज रोहित्र थकीत बिले भरल्यानंतरच देण्याची प्रक्रिया महावितरणच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. शेतशिवारातील विद्युत बिलांची वसुली अनेक वर्षांपासून बंदच आहे. नैसर्गिक आपत्तीच्या घटना सातत्याने घडत गेल्याने युती सरकारच्या काळात शेतशिवारातील वीज बिलांची वसुली थांबविण्यात आली होती.

परंतु, आता शेतशिवारातील रोहित्र जळाल्यानंतर ते महावितरणकडे जमा करण्यात येत असताना त्याजागी दुसरे रोहित्र देण्यासाठी हात आखडता घेण्यात येत आहे. सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील २७ रोहित्र सिल्लोड येथील महावितरणच्या विभागीय कार्यालयात जमा करण्यात आली आहे. परंतु, काही शेतकरी येथे रोहित्र मिळण्याच्या मागणीसाठी गेली असता रोहित्रावर जोडणी असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी थकीत वीजबिले न भरल्यास थ्री-फेज रोहित्र मिळणार नसल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सातत्याने निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असताना आता अस्मानी नंतर सुलतानी संकटाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ओल्या दुष्काळाचे सावट तालुक्यावर घोंघावत असताना पदरी पडणारा शेतीमाल डोळ्यासमोर पाण्यात जात आहे. असे असताना आता रोहित्रासाठी होणारी अडवणूक शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी आहे. या प्रश्नी सिल्लोड येथील विभागीय कार्यालयाचे सहायक कार्यकारी अभियंता व्ही.एस. लहाने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी थकीत वसुली सुरू असल्याचा दुजोरा दिला. परंतु, या प्रकरणी स्पष्टपणे बोलण्यास देखील त्यांनी नकार दिला.

बिले भरण्यासाठीही शेतकऱ्यांची अडचण

थकीत बिले भरल्यानंतरच थ्री फेज रोहित्र देण्यात येणार असल्याने रोहित्रावर असलेल्या जोडणीचा विचार करता किती रक्कम भरावयाची आहे, याची माहिती मिळविताना देखील शेतकऱ्यांना अडचणीचे होत आहे. उपविभागात गेल्यानंतर तर तेथील कर्मचारी चालू वर्षातील तीन बिले भरा असे सांगत आहे.

परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून बिलेच वाटप करण्यात आली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा ग्राहक क्रमांक सुद्धा माहीत नाही. विचारणा केल्यानंतर कर्मचारी देखील नीट माहिती देत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी झाली आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असताना रोहित्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना थकीत बिले भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांना अडचणीत आणीत आहे. जळालेल्या रोहित्रांच्या आडून शेतकऱ्यांची अडवणूक न करता तातडीने थ्री- फेज रोहित्र द्यावे, अन्यथा भाजप किसान मोर्च्याच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. - मकरंद कोर्डे, सरचिटणीस, भाजप किसान मोर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाळा ५ किमी अंतरावर असेल तर विद्यार्थ्याला ६००० रुपये मिळणार, सरकारची मोठी घोषणा, योजनेचा लाभ कसा मिळवायचा?

Mhada Lottery: म्हाडाला लागणार घरांची लाॅटरी, सर्वसामान्य मुंबईकरांचं होणार स्वप्नपूर्ण; पहा कधी निघणार सोडत?

Pune News : वेश्याव्यवसायास नकार दिल्याने बांगलादेशी अल्पवयीन मुलीला कोंडून मारहाण

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Pune Crime : हडपसर, वाकडेवाडी परिसरात अमली पदार्थ जप्त, पाच जणांना अटक

SCROLL FOR NEXT