MSRTC deploys 1265 buses from statewide locations to Tuljapur sakal
छत्रपती संभाजीनगर

MSRTC : तुळजापूरसाठी राज्यभरातून १ हजार २६५ बस, महामंडळाचे नियोजन; लालपरी सज्ज

तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरूवारपासून (ता. ३) सुरूवात झाली आहे. या महोत्सवा दरम्यान राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात येतात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.

अविनाश पोफळे

धाराशिव : तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाला गुरूवारपासून (ता. ३) सुरूवात झाली आहे. या महोत्सवा दरम्यान राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी तुळजापुरात येतात. त्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे.

खास करून पोर्णिमेनिमित्त तुळजापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातून सुमारे १ हजार २६५ बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ८३ जादा बस धावणार आहेत.

घटस्थापना ते दसरादरम्यान तुळजापूरला दर्शनास जाण्यासाठी महामंडळाच्या धाराशिव विभागातून दोनशे बस सोडण्यात आल्या आहेत. त्यानंतरच्या पोर्णिमेनिमित्त १४ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १ हजार २६५ बस सोडल्या जाणार असून नियोजत पूर्ण झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव, बीड, लातूर, परभणी, नगर जिल्ह्यांतून ८१० बसचे नियोजन आहे. पुणे विभागातून सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांतून ४५५ एसटी बस तुळजापूरला सोडण्यात येणार आहेत. महामंडळाच्या इतर विभागांतील १०७, धाराशिव विभागातील १२०, तर पुणे विभागातून २८ कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

तुळजापुरातील बसचे नियोजन

पौर्णिमेनिमित्त १४ ते १८ ऑक्टोबरदम्यान तुळजापुरातील मंगरूळ रस्त्यासह धाराशिव आणि काकरंबा रस्ता अशा तीन ठिकाणी एसटी बस पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. याठिकाणी तीन शिफ्टमध्ये कर्मचारी, अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. बायपास रस्त्याने गाड्या जातील. तर नवरात्रात मुख्य बस स्थानकातून बसची ये-जा करतील, अशी माहिती महामंडळाच्या धाराशिव विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

गतवर्षीची यात्रा आणि एसटी

  • धाराशिव विभागातून सोडलेल्या बस - २४९

  • एकूण वाहतूक - ८ लाख २२ हजार किमी

  • एकूण उत्पन्न- ४ कोटी १२ लाख ६५ हजार रुपये

  • राज्यातून सोडलेल्या बस - ११८२

  • एकूण वाहतूक - १६ लाख ३८ हजार १८६ किमी

  • एकूण उत्पन्न ः ७ कोटी १९ लाख २९ हजार

तुळजाभवानीमातेच्या नवरात्रोत्सव आणि खास करुन पोर्णिमेनिमित्त धाराशिवसह दहा जिल्ह्यांतून १२६५ एसटी बस सोडण्यात येतील. त्यामुळे भाविकांना तुळजापुरात येण्यासाठी मुबलक बस असतील. भाविकांनी एसटी बसमधून सुरक्षित प्रवास करावा.

- अभय देशमुख, विभागीय वाहतूक अधिकारी, धाराशिव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT