Aurangabad Aurangabad
छत्रपती संभाजीनगर

महापालिका म्हणते, आम्ही टाकली फक्त दीडशे वाहने!

तीन वर्षांपूर्वी महापालिकेसह आरटीओ, पोलिस प्रशासनाने शहरातील भंगार वाहने उचलण्याची मोहीम राबविली होती. त्यावेळी १३२ वाहने उचलून मैदानातील खुल्या जागेत टाकण्यात आली

माधव इतबारे

मैदानाच्या परिसरात हजारो वाहने भंगार वाहने पडून असताना मैदानाची जबाबदारी असलेला क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे

औरंगाबाद: गरवारे मैदानावरील खुल्या जागेवर महापालिकेमार्फत तीन वर्षांपूर्वी १३२ तर गेल्या तीन दिवसात फक्त २१ भंगार वाहने टाकण्यात आली आहेत, उर्वरित वाहने पोलिसांनी टाकली असल्याचा दावा प्रशासनातर्फे केला जात आहे. प्रत्यक्षात मैदानाच्या परिसरात हजारो वाहने भंगार वाहने पडून असताना मैदानाची जबाबदारी असलेला क्रिडा विभाग मात्र अंधारात आहे.
महापालिकेच्या गरवारे मैदानावर दररोज हजारो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. तसेच पोलिस व सैन्य भरतीसाठी युवक याठिकाणी येऊन तयारी करतात. त्यांना गेल्या काही दिवसांपासून मैदानाच्या परिसरातील भंगार वाहने, विद्युत विभागाने टाकलेल्या जुन्या पोलचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरोना संसर्गामुळे नागरिक सुरक्षित अंतर पाळून मैदानाच्या मोकळ्या जागेत व्यायाम करतात. पण दिवसेंदिवस मोकळी जागाच कमी होत आहे. कारण या जागेचा वापर भंगार वाहने टाकण्यासाठी केला जातो.

तीन वर्षांपूर्वी महापालिकेसह आरटीओ, पोलिस प्रशासनाने शहरातील भंगार वाहने उचलण्याची मोहीम राबविली होती. त्यावेळी १३२ वाहने उचलून मैदानातील खुल्या जागेत टाकण्यात आली. उर्वरित वाहने वाहतूक शाखेच्या पोलिसांनी टाकल्याचे यांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा कार्यकारी अभियंता डी. के. पंडीत यांनी सांगितले. गरवारे मैदानासंदर्भातील सर्व निर्णय क्रीडा विभागातर्फे घेतले जातात. पण भंगार वाहने याठिकाणी टाकताना क्रिडा विभागाला कुठलीच कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही वाहने कधी व कुणी-कुणी टाकली याविषयी क्रिडा विभाग अंधारात आहे.

भंगार वाहनांचा लिलाव करणार, पण कधी?
सुमारे अडीच ते तीन वर्षांपासून हजारो भंगार वाहने या ठिकाणी पडून आहेत. यातील १३२ वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून, ही फाईल लेखा विभागात आहे. लवकरच याविषयी निर्णय होईल, असे श्री. पंडित यांनी सांगितले.

गरवारे मैदानाच्या जागेवर वाहतूक शाखेतर्फे काही वर्षापूर्वी महापालिकेच्या परवानगीने भंगार वाहने टाकण्यात आली होती. पण सध्या पोलिस याठिकाणी कुठलीही वाहने टाकत नाहीत.
-सुरेश वानखेड, साहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक शाखा.

गरवारे मैदानाच्या खुल्या, वापर नसलेल्या जागेत विद्युत विभागाचे साहित्य ठेवण्यात आले आहे. या साहित्याचा लवकरच लिलाव केला जाणार आहे.
-ए. बी. देशमुख, कार्यकारी अभियंता विद्युत विभाग.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest Controversy : "सीजेपीच्या आंदोलनामागे अमेरिकन अब्जाधीश इलॉन मस्कचा हात!"; भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांचा खळबळजनक आरोप

१७ ऑक्टोबरला सूर्याचं राशीपरिवर्तन; मेष राशीसह ६ राशींचं नशीब पालटणार? मिळू शकतो मोठा फायदा

Marathi News Live Updates: 'लहरा दो तिरंगा' मोर्चाच्या १० मिनिटे आधी हायव्होल्टेज ड्रामा; अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

ना श्रीराम ना माधुरी; 'ही' आहे धकधक गर्लच्या घराची नेमप्लेट, फराह खानसुद्धा झाली अवाक

CJP Tiranga March : अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात; ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांची कारवाई, दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT