संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
छत्रपती संभाजीनगर

विस्थापितांसाठी दिलासादायक बातमी...निवाऱ्यासाठी महापालिका उपलब्ध करून देणार शाळा

माधव इतबारे

औरंगाबाद - लॉकडाऊनमुळे शहरातील नागरिक गावाकडे स्थलांतरित होत असून, अशा नागरिकांना शहरातच थांबविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे त्यांच्या निवाऱ्यासाठी महापालिका वीस ते पंचवीस शाळा उपलब्ध करून देणार आहे. अशा नागरिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सोमवारी (ता. ३०) सांगितले. 

गावाकडची परिस्थिती बिघडण्याचा धोका 
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. शहरात कामच उरले नसल्यामुळे इथे राहून काय उपयोग अशी भावना झाल्याने अनेक जण शहर सोडत आहेत. काहीजण तर पायीच गावाकडे निघाले आहेत. त्यांच्या अडचणींचा डोंगर कोसळलेला आहे. मात्र, अशा नागरिकांमुळे गावाकडची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. यातील एकजरी संक्रमित असला तरी अख्ख्या गावालाच लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यातून परिस्थिती चिघळू शकते. यावर पर्याय म्हणून या सर्वांना शहरात थांबवून त्यांची येथेच व्यवस्था करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना शहरात थांबविण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. अशा विस्थापितांच्या निवासासाठी महापालिका आपल्या वीस ते पंचवीस शाळा उपलब्ध करून देणार आहे, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. शाळेत पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था आहे. शाळांमध्ये राहणाऱ्या विस्थापितांच्या भोजनाची व्यवस्था सेवाभावी संस्थांनी (एनजीओ) करायची आहे. काही संस्थांनी यासाठी पुढाकार घेतला आहे अशी माहिती त्यांनी दिली. 

दवाखाने बंद ठेवाल तर कारवाई 
कोरोना व्हायरसच्या पाठोपाठ ‘सारी’ या साथीच्या आजारानेही शहरात डोके वर काढले आहे. यात एकाचा मृत्यू झालेला असून आठ ते दहाजण रूग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे शहरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पाश्वर्भूमीवर खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांनी आपले दवाखाने सुरु ठेवावेत, दवाखान्यात आलेल्या रुग्णाची तपासणी करावी. कोरोना व्हायरस किंवा सारीचे संशयित रुग्ण आढळल्यास त्याची माहिती महापालिकेला द्यावी, दवाखाने बंद ठेवले तर महापालिकेकडून कारवाई केली जाईल असा इशारा खासगी डॉक्टरांना देण्यात आला आला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT