press confarence.jpg 
छत्रपती संभाजीनगर

Big Breaking : किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ, मेहुण्याने केली हत्या; दोघेही अटकेत

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : बहीण-भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. या हत्येमागील रहस्य उलगडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुन्याणेच  ही हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.

 गुन्हेशाखेच्या पथकाने दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेला माल पोलिसांनी जप्त केला आहे. सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव), अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर) असे अटकेतील दोघांची नावे आहेत. अटकेतील आरोपी सतीश हा मयताचा चुलत भाऊ आहे तर अर्जुन हा त्याचा मेहुणा आहे.

या बाबत माहिती देतांना पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, की शहरातील सातारा परिसर भागात गुरुवारी किरण खंदाडे-राजपूत वय-१८, सौरभ खंदाडे-राजपूत वय-१६ यांची राहत्या घरी गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठत तपासला सुरुवात केली.

त्यावेळी घरात चार कप पोलिसांना आढळले होते. त्यावरून ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा दाट संशय पोलिसांना होता. पोलिसांनी दोन्ही मयताच्या मोबाईल क्रमांकाची तपासणी सुरु केली. त्यानंतर चुलत भाऊ सतीश आणि त्याचा मेहुणा अर्जुन या दोघांवर पोलिसांना संशय आल्याने दोघांनाही विचारपूस करण्यात आली.

विचारपूस दरम्यान दोघेही सुरुवातीला तोंड उघडण्यास तयार नव्हते त्या नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत ही निर्घृण हत्या घरातील सोन्यासाठी केली असल्याची कबुली दिली. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांच्या ताब्यातून चोरी केलेलं सोन जप्त करण्यात आलं आहे.

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: ३९० हून अधिक विकेट्स अन् २७०० धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूची निवृत्तीची घोषणा! १४ वर्षांनंतर केलं अलविदा

Navi Mumbai jewellery Shop Robbery video : बुरखा घालून आले अन् बंदूक दाखवत भरदिवसा 'ज्वेलरी शॉप' लुटून निघूनही गेले!

Pune land scam: बोपोडी जमीन गैरव्यवहार प्रकरणात मोठी अपडेट; तहसीलदारांचा जामीन फेटाळला, कोर्टात नेमकं काय घडलं?

Viral Video: धावत्या रिक्षात कपलचा सुरु होता रोमान्स, लाईव्ह व्हिडिओ व्हायरल झाला अन्...

Latest Marathi News Live Update : महापालिकेसाठी उमेदवार उद्यापासून सादर करणार अर्ज

SCROLL FOR NEXT