कारकीन (ता.पैठण, जि.औरंगाबाद) : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी भेट दिली व नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मागासवर्गीय आयोगाच्या उपसंचालक अनुराधा दुसाने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील. सकाळ
छत्रपती संभाजीनगर

अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्याची पैठणला भेट, साधला संवाद

विनोद शहाराव

ढोरकीन (जि.औरंगाबाद) : कारकीन (ता.पैठण) (Paithan) येथे मंगळवारी (ता.२०) सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे (National Commission For Scheduled Castes) सदस्य सुभाष पारधी (Subhash Pardhi) यांनी भेट दिली. जिल्हा परीषद प्राथमिक शाळा (वस्तीशाळा) येथे त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (IAS Sunil Chavan), ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील (IPS Mokshada Patil), मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले (IAS Mangesh Gondawale), उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसील चंद्रकांत शेळके आदी उपस्थित होते. कारकीनच्या महिला सरपंच भारती नवले यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री.पारधी यांचा सत्कार केला. जिल्हाधिकारी यांनी कारकीन गावातील दलित वस्तीमध्ये काही कामे अपूर्ण असल्यास ती पुर्ण करुन नवीन विकास कामे करु. (national commission for scheduled castes member visit aurangabad news glp 88)

त्यानंतर सुभाष पारधी यांनी थेट दलित नागरिकांशी संवाद साधत गावांमध्ये किती जणांना घरकुल मिळाले, किती नागरिकांकडे शौचालय आहेत, किती कुटुंबाना उज्वला योजनेचा लाभ मिळाला. उच्च शिक्षित तरुणांची संख्या किती? गावात दलितांमध्ये फक्त एकच युवक वकील झाला. त्याचे सुभाष पारधी यांनी अभिनंदन केले. यावेळी काही नागरिकांना शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Sonography: कारमध्येच करायचे सोनोग्राफी! नाशिकमध्ये अवैध गर्भलिंगनिदान करणारं रॅकेट उघडीकस, कंपनीवरही गुन्हा

Latest Marathi News Live Update : माझ्या मुलीनं आत्महत्या केली नाही, तिला मारण्यात आलं; गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी कुटुंबीयांचा आरोप

तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, लंडनच्या गुलाबी थंडीतील व्हिडिओ, ट्रेलर चर्चेत

Horoscope Prediction : 7 डिसेंबरपासून मंगळ बदलणार त्याची चाल; 5 राशींचा गोल्डन टाईम सुरु, प्रोमोशन नक्की !

Weight Loss Plan : पोटभर भात-भाकरी-ब्रेड खावूनही 7 दिवसांत कमी केले 1.7Kg वजन; तुम्हीही फॉलो करू शकता ही स्मार्ट पद्धत

SCROLL FOR NEXT