औरंगाबाद : भटक्या कुत्र्याला कॉलर पट्टा बांधणारे एनिमल पिअर्सचे सदस्य.
औरंगाबाद : भटक्या कुत्र्याला कॉलर पट्टा बांधणारे एनिमल पिअर्सचे सदस्य.  
छत्रपती संभाजीनगर

अंधारात चमकताहेत रस्त्यांवर हजारो गळपट्टे 

मधुकर कांबळे

औरंगाबाद : रात्रीच्या अंधारातून एकटे दुकटे जात असताना शहराच्या अनेक भागात चमचमणारे दोन डोळे आणि लख्ख प्रकाशातील हजारो पट्टे पहायला मिळत आहेत. जर रात्री उशीरा एकट्याने प्रवास करत असाल तर नक्कीच भितीने थरकाप होईल असा तो प्रसंग असेल. यासाठी रात्री उशीर अंधारातून जात असाल तर असे दृश्‍य कधी ना कधी प्रत्येकाला दिसणार आहे अशी परिस्थिती शहरात आजघडीला झाली आहे. 

बेघर माणसांना किमान उड्डाणपूल, रिकाम्या इमारती, निवारागृहात आसरा मिळत असतो, मात्र रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्यांना आलाय कुठला निवारा? यासाठी प्राणीप्रेमी या कुत्र्यांसाठी महापालिकेने निवारागृहे सुरू करावेत यासाठी पाठपुरावा करत आहेत. तथापि, निवारागृहे नसल्याने हे कुत्रे भित भितच रात्रीच्यावेळी कधी फिरतात तर कधी निवारा मिळाला तर निवांतपणे बसून जातात. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अंधारात त्यांना वाहनधारक धडक देतात, कधी बसलेले असतील तर मागच्या किंवा पुढच्या पायावरून वाहन घेऊन जातात आणि त्यात ते जखमी होतात. बऱ्याचवेळेला रात्रीच्यावेळी कुत्रे दिसत नसल्याने आणि अचानक समोर आल्याने अपघात होतात. एनिमल पिअर्स या भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या संघटनेचे पुष्कर शिंदे यांनी सांगीतले, कती दररोज जखमी कुत्र्यांना मदत करण्यासंदर्भात नागरिकांकडून १० ते १५ फोन येतात, त्यापैकी रोज ३ ते ४ कुत्रे अपघातात जखमी झालेले असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी झालेल्या अपघाताचे प्रमाण जास्त असल्याचे आमच्या लक्षात आले. यामुळे आम्ही हे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 

अंधारात चमकणाऱ्या कॉलर पट्ट्या 

एनिमल पिअर्सचे सदस्य व डोनेटकार्टच्या प्रयत्नांतून भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात अंधारात चमकणाऱ्या कॉलर पट्ट्या बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पोलिस महानिरीक्षक रवींद्र सिंगल हेदेखील श्‍वानप्रेमी आहेत. त्यांनी एका भटक्या कुत्र्याच्या गळ्यात कॉलर पट्टी बसवून या उपक्रमाची सुरूवात केली आहे. 
अपघातात भटक्या कुत्र्यांना त्यांचे पाय गमवावे लागतात किंवा काही तरी गंभीर दुखापत होते. अनेक वेळा तर त्यांना जीव गमवावा लागतो. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

प्राणीप्रेमींनीही मदतीसाठी यावे पुढे 

बरेचसे अपघात रात्रीच्या वेळी होतात, जेव्हा वाहन चालक आपल्या वाहनाखाली येणाऱ्या कुत्र्यांकडे विशेष लक्ष देत नाहीत. चमकदार कॉलर पट्ट्या अंधारात चमकतात. यासाठी गळ्यात अशी कॉलर पट्टी असलेले भटके कुत्रे अंधारातही दिसू शकतील व अपघाताचे प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा श्री.शिंदे यांनी व्यक्त केली. पहिल्या टप्प्यात १ हजार भटक्या कुत्र्यांच्या गळ्यात कॉलर पट्ट्या बांधण्यात आल्या आहेत. आणखी १ हजार कॉलर पट्टे येणार आहेत. दोन हजार कॉलर पट्टे बांधण्यात येणार आहेत. 

अल्प किंमतीमध्ये मिळणारे हे कॉलर पट्टे मुक्या जीवांचे प्राण वाचवू शकतात. यामुळे नागरीकांनीही आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांना जीवदान देण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन एनिमल पिअर्सने केले आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT