new 538 corona patients 7 died during treatment in Marathwada aurangabad update sakal
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाचे आणखी ५३८ रुग्ण मराठवाड्यात उपचारादरम्यान सात जणांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात १६४ कोरोनाबाधितांची भर पडली

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : मराठवाड्यात बुधवारी (ता. ९) दिवसभरात कोरोनाचे ५३८ रुग्ण दाखल झाले. दरम्यान, बीड-लातुरमध्ये प्रत्येकी दोन, औरंगाबाद- जालना-नांदेडला प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.औरंगाबाद जिल्ह्यात १६४ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यात महापालिका हद्दीत ८४ तर ग्रामीण भागातील ८० जणांचा समावेश आहे.

रुग्णांची संख्या एक लाख ६८ हजार ८८१ वर पोचली आहे. सध्या ३ हजार १३१ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी ३६५ रुग्ण बरे झाले. आजपर्यंत एक लाख ६२ हजार ३४ रुग्ण बरे झाले आहेत. वावना (ता.फुलंब्री) येथील पुरुषाचा (वय ७४) उपचारादरम्यान मृत्यू झाला.जिल्ह्यात आतापर्यंत तीन हजार ७१७ जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेडला ९६ बाधित

नांदेड जिल्ह्यात ९६ कोरोनाबाधित दाखल झाले. रुग्णसंख्या एक लाख दोन हजार ६८६ असून ९९ हजार १७७ रुग्ण बरे झाले आहेत. ८२४ जणांवर उपचार सुरू आहेत. हिमायतनगर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार ६८५ जणांचा मृत्यू झाला आहे.

परभणी ४४, हिंगोलीत ३३ रुग्ण

परभणी जिल्ह्यात ४४ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ५७ हजार १७९ असून ५५ हजार ३३३ रुग्ण बरे झाले आहेत. ५३७ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एक हजार ३०९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात ३३ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या १९ हजार ३२० असून त्यापैकी १८ हजार २४० रुग्ण बरे झाले आहेत. ६७८ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे.

लातुरमध्ये दोघांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) नवे १०२ रुग्ण दाखल झाले. ४२१ आरटीपीसीआर चाचण्यांतून ७१ तर ७२९ ॲन्टीजेन चाचण्यांतून ३१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. रुग्णसंख्या एक लाख चार हजार ७१९ असून एक लाख एक हजार ४९४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ८४५ जणांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान, आणखी दोघांचा मृत्यू झाला. आतापर्यंत दोन हजार ४७६ जणांचा मृत्यू झाला आहे.

जालन्यात बारा रुग्ण

जालना जिल्ह्यात नवे १२ रुग्ण आढळले. रुग्णसंख्या ६७ हजार ४३५ असून आणखी ११७ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ६५ हजार ६८५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ५३७ जणांवर उपचार सुरू आहेत. आणखी एकाचा मृत्यू झाला. आतापर्यंत एक हजार २१३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अशी रुग्णवाढ

  • औरंगाबाद १६४

  • लातूर १०२

  • नांदेड ९६

  • उस्मानाबाद ७२

  • परभणी ४४

  • हिंगोली ३३

  • बीड १५

  • जालना १२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

Latest Maharashtra News Updates : ..तर हे स्पष्ट होईल, की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे! - उद्धव ठाकरे

Pune Crime: आषाढी वारीत मुलीवर अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट, नराधमांना अटक; आरोपी निघाले...

Murud Crime : पोलिसांच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचा संशय; नातेवाईकांनी रस्ता अडवला

Government Recruitment 2025: राज्यात मेगाभरती! मुख्यमंत्र्यांची घोषणा; भरती प्रक्रियेचे नियम बदलणार

SCROLL FOR NEXT