file photo 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील नवीन स्टार्टअप्सला मिळणार बुस्ट

प्रकाश बनकर

औरंगाबाद : "सीएमआयए' या उद्योजक संघटनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या "मॅजिक' या ग्रोथ इन्क्‍युबेशन सेंटरला केंद्र शासनाने "होस्ट इन्स्टिट्यूट'असा दर्जा बहाल केला आहे. यामुळे आता मराठवाड्यातील तरुण उद्योजकांना स्वतःचे स्टार्टअप्स सुरू करणे सहज शक्‍य होणार आहे. तरुणांनी सुचवलेल्या उद्योजकीय नवकल्पना केंद्र सरकारला आवडल्या तर 15 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान सरकार देणार आहे. 

"मराठवाडा एक्‍सलरेशन फॉर ग्रोथ ऍण्ड इन्क्‍युबेशन' (मॅजिक) ही सीएमआयएच्या अखत्यारीत "ना नफा' तत्त्वावर सुरू झालेली कंपनी आहे. मराठवाड्यातील हुशार, होतकरू व उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी स्थापन करण्यात आली. मॅजिक ही देशातील अशी एक संस्था आहे जी देशात एखाद्या उद्योजक संघटनेने प्रथमच सुरू केली आहे. 
हेही वाचा :53 आमदार,खासदारांना पाणी प्रश्‍नावरील बैठकीचे वावडे (वाचा कोण आहेत ते)...  
पाच स्टार्टअप उभारणीस मदत 

आजवर मॅजिकच्या मदतीने पाच स्टार्टअप यशस्वीपणे सुरू करण्यास तरुण उद्योजकांना साहाय्य झाले आहे. आगामी काळात आणखी दहा स्टार्टअप्सना असे मार्गदर्शन केले जाणार आहे. यात उद्योग सुरू करण्यासाठी वित्तीय मदत कुठे मिळेल या मार्गदर्शनासह, तो सुरू झाल्यावरही योग्य दिशा आणि मार्गदर्शन देण्यात येते. तुम्ही निवडलेल्या उत्पादनाचे डिझाईन, तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाते. 

मॅजिकला मार्गदर्शकाचा दर्जा 

केंद्र सरकारने मॅजिकला मार्गदर्शकाचा दर्जा दिला असून, इन्क्‍युबेटर योजनेत होस्ट इन्क्‍युबेटर (एचआय)आणि बिझनेस इन्क्‍युबेटर (बी.आय.) असा दर्जा मिळवणाऱ्या देशातील मोजक्‍या संस्थांपैकी मॅजिक एक ठरली आहे. संशोधन प्रणालीवर आधारित मध्यम, लघू व सूक्ष्म उद्योजक घडवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. 

हेही वाचा :अन्‌ आमदार प्रशांत बंब म्हणाले, कोण चिखलीकर....   
15 लाखांपर्यंत अनुदान 

होस्ट इन्स्टिट्यूट योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने 15 लाखांपर्यंतचे अनुदान दिले जाईल. यात मॅजिकने पाठवलेले प्रस्ताव एमएसएमई मंत्रालय तपासून अनुदानाला मंजुरी देईल. हे अनुदान विद्यार्थ्याला 100 टक्के, तर एमएसएमई उद्योगाला प्रकल्पाच्या 85 टक्के दिले जाईल. प्रकल्प निवड होताच दोन टप्प्यात हे अनुदान वितरित केले जाईल. "न्यू इंडिया' या संकल्पनेवर आधारित नव्या स्टार्टअप्सकडून व्यवसायाच्या नवकल्पनांचे स्वागत आहे. यासाठी विनायक जोशी, डेप्युटी सेक्रेटरी जनरल, सीएमआयए, बजाज भवन रेल्वेस्टेशन रोड औरंगाबाद : अथवा 
Contact@magicaurangabad.com यावर संपर्क साधावा, असे आवाहन सीएमआयएच्या वतीने करण्यात आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijit Dipke Criticism : 'कॉमेडियनना भेटायला वेळ, पण जरांगेंशी बोलायला नाही ’; अभिजीत दिपकेंचा सरकारवर घणाघात

Dahi Handi Govinda Death : दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून परतताना शिरोळमधील २८ वर्षीय गोविंदाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, शेवटचा फोटो बाळूमामांसोबतचा

Onion Payment: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे सव्वा दोन कोटी कांद्याचे पैसे अडकले; शरद पवारांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट फोन

मालिकेत सुखाचा संसार पण खऱ्या आयुष्यात सिंगल; दुसऱ्या लग्नाची स्वप्न पाहणाऱ्या तेजश्रीचं वय काय?

Ujani Canal: कालवा तुडुंब, पण वीज गायब; महावितरणच्या लोडशेडिंगमुळे पेनूर परिसरातील शेतकरी संतप्त, पिके जळू लागली

SCROLL FOR NEXT