Aurangabad Crime News esakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : तलवार घेऊन नाचणाऱ्या नवरदेवाला बेड्या, अतिउत्साह नडला

लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेव तुरुंगात

सकाळ डिजिटल टीम

औरंगाबाद : हातात तलवार, जांबिया घेऊन बेधुंद नाचणाऱ्या नवरदेवासह सहा मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना औरंगाबाद (Aurangabad) येथील पुंडलिकनगर भागात घडली आहे. या सर्वांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. नवरदेव बिभीषण शिंदे (वय २१), यश साखरे (१९), शेख बादशाह (२२), शुभम मोरे (२२), किरण रोकडे (सर्व रा.रेणुकानगर) आणि आणि वसीम शेख (२०, रा.लतीफनगर) असे आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी रोजी बिभीषण शिंदे याचा हळदीचा कार्यक्रम होता. तलवार हातात उंच धरत बेधुंदपणे नवरदेवासह मित्र नाचू लागले.(Newly Married Man Arrested Along With Six Friends In Aurangabad)

या हुलडबाजीचा व्हिडिओ चित्रित करण्यात आला. त्यानंतर तो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल करण्यात आला. या व्हिडिओ वरुन पोलिसांनी कारवाई केली. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवरदेवाला तुरुंगात जावे लागले आहे.पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, सहायक पोलिस निरक्षक शेषराव खटाणे यांच्या पथकाने संबंधितांना अटक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT