करोडी येथील सर्व रस्ते बंद करण्यात येऊन गावात करण्यात आलेली नो एंट्री.  
छत्रपती संभाजीनगर

करोडी गावात बाहेरच्यांना ‘नो एंट्री’!

आर. के. भराड

वाळूज - कोरोनाच्या भयाने गावागावातील नागरिक बाहेरगावाहून येणारांना गावबंदी करीत आहेत. काही ठिकाणी तर कोरोनाची एवढी धास्ती घेतलीय की, गावात येणारे रस्ते गावकऱ्यांनी दगड, काटेकुट्यांनी अडविले आहेत. औरंगाबादजवळच्या वाळूज औद्योगिक वसाहतीत वसलेल्या करोडी गावच्या ग्रामस्थांनी तर बाहेरच्यांना ‘नो एंट्री’ केली आहे. 
बाहेरून कुणी गावात आले अन् त्याला कोरोनाची बाधा झालेली असली तर ती अख्ख्या गावालाही होईल, या भीतीने गावकरी चिंताग्रस्त झाले आहेत. त्यासाठी ते विविध उपाययोजनाही करीत आहेत. कुणी काट्याकुट्या टाकून रस्ते अडवीत आहे, तर कुठे गावातली तरुण मंडळी दंडुके घेऊन रस्त्यारस्त्यांवर उभे ठाकले आहेत. आमच्या जिवाला धोका आहे, मग आम्ही दुसरे करणार तरी काय, असा सवालही ग्रामस्थ विचारत आहेत. त्यासाठीच करोडी गावाजवळ रस्ता अडवून गावात नो एंट्री करण्यात आली आहे. 

समाजकंटकांमुळेच ही वेळ 
देशात कोरोना या विषाणूची साथ चालू असल्याने तसेच कोरोनाचा वाढता आलेख लक्षात घेता शासनाने जमावबंदी व संचारबंदी घोषित केली. मात्र, काही समाजकंटक या आदेशाची पायमल्ली करीत आहेत. लाठीचार्ज करूनही काहीजण रस्त्यांवर फिरताना दिसून येतात. यावर पर्याय म्हणून बाहेरून कुणीही गावात येऊ नये, यासाठी करोडी येथील सर्व रस्ते बंद करण्यात येऊन गावात नो एंट्री करण्यात आली आहे. तसेच गावातील नागरिकांनी कोणीही बाहेर पडू नये, सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे आवाहनही गट ग्रामपंचायत करोडी-साजापूरचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील व कर्मचारी यांनी केले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अशीही भीती 
औरंगाबाद शहरात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला होता. त्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या. परंतु आताही शहरात काही संशयित रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हाभरातही काहीजण संशयित आढळलेले आहेत. शिवाय बाहेरगावातून अनेकजण खेड्यांकडे धाव घेत आहेत. मात्र, यातील एकाला जरी संसर्ग झालेला असेल तर गावाला त्रास होईल, या धास्तीने गावकरी असे उपाय अवलंबीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT