ज्येष्ठ नागरिॉक  
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : आता ज्येष्ठांचा एकाकीपणा होणार दूर, वाचा ते कसे..!

मधुकर कांबळे

औरंगाबाद  : आजी-आजोबांना बाहेरगावी राहणाऱ्या मुलाला, नातवाला बोलावे, पाहावे वाटते; मात्र ते फोन करीत नाहीत किंवा लवकर येत नाहीत. तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले खरे; पण आता वय झालंच. बटणं कळत नाहीत. कधी निवृत्तीनंतर भावनेच्या भरात जमापुंजी मुलगा, मुलीला देऊन टाकली, ते पाहत नाहीत. कायदेशीर बाबींची माहिती नाही. ती ऑनलाइन मिळते; पण कसे शोधायचे, कसे पाहायचे माहिती नाही, असे अनेक प्रश्‍न ज्येष्ठांना पडतात. यासाठी ‘नायलिट’कडून पाच दिवसांचे ऑनलाइन मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अण्ड  इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (नायलिट) ही केंद्राची स्वायत्त वैज्ञानिक संस्था आहे. ‘नायलिट’ने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्ट फोनच्या वापराबद्दल मोफत ऑनलाइन प्रशिक्षण सुरू केले आहे. डिजिटल सोशल अवेअरनेस प्रोग्राम फॉर सिनिअर सिटीझन्स याअंतर्गत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

लॉकडाउनचा ‘मुहूर्त’ साधून बालविवाहाचे ‘शुभमंगल’!  
ज्येष्ठ नागरिकांचा एकाकीपणा घालण्यासाठी, दूर राहणाऱ्या नातलगांशी संपर्क करण्यासाठी स्मार्ट फोनचा वापर करण्यास शिकविले जाणार आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा समावेश आहे. आरोग्य सेतू अॉप कसे डाउनलोड करायचे, त्याचे उपयोगही शिकविले जाणार आहेत.

‘नायलिट’चे श्रीकांत भोगे यांनी सांगितले, की मोबाईलच्या वापरामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक देखरेख, वैयक्तिक माहिती, सामाजिक दळणवळण, सुरक्षा इत्यादींच्या विविध गरजा पूर्ण होऊ शकतात आणि परिणामी त्यांचे जीवनमान सुधारू शकते. फसवणूक टाळणे, काळजी आणि संरक्षण, सरकारी योजना, विविध कायद्यांची माहिती, कृती इत्यादींसह त्यांच्या सुरक्षिततेसह, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्यसेवा, योग आणि निरोगी व्यायाम, वैयक्तिक कायद्याशी संबंधित माहिती दिली जाणार आहे.

सकाळी ११ ते दुपारी १२ या वेळात पाच दिवस हे प्रशिक्षण होईल. प्रत्येक आठवड्याला नवीन बॅच असणार आहे. या ऑनलाइन प्रशिक्षणात सामील होण्यासाठी नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी https://docs.google.com/forms/d/e/१FAIpQLSeuetB६MNRuh५qST२GcJzH५६coby८bfhDC९ONUzr३rh२C७Jpg/viewfor वर मराठीत नाव, जन्मतारीख, आधार क्रमांक आणि अ‍ॅड्रॉईड आधारित मोबाईल नंबर नोंदवावा, असे आवाहन श्री. भोगे यांनी केले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bangladesh Hindu AttacK: हिंदू व्यापाऱ्याला बेदम मारहाण, जीव गेल्यावर मृतदेहावर नाचले हल्लेखोर; बांग्लादेशातील अराजकता थांबेना

Latest Marathi News Updates: "आजचा भारत अंतराळातून महत्त्वाकांक्षी दिसतो!": ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे शब्द

Gold Rate: पैसे तयार ठेवा! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होणार? अहवालातून महत्त्वाचा खुलासा

Nitin Gadkari and Next PM : ''म्हणून मोदींनंतर गडकरीच पंतप्रधान...''; काँग्रेस नेत्याने केलंय मोठं विधान!

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

SCROLL FOR NEXT