2Aurangabad_Municipal_Corporation_0 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेतील खड्डे बुजविण्यासाठी डांबराऐवजी पॉलिमर तंत्रज्ञानाचा होणार वापर

शेखलाल शेख

औरंगाबाद : शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळणी झाली आहे. पॅचवर्कच्या कामांसाठी महापालिकेकडून निविदा काढूनही कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता महापालिकेने स्वतःचेच पथक करून शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय खड्डे बुजविण्यासाठी डांबराऐवजी आता पॉलिमर आधारित तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. त्यासाठी संबंधित कंपनीकडून तातडीने हे साहित्य खरेदी केले जाणार आहे.


साहित्य खरेदीची संचिका आता लेखा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केली आहे. मंजुरी मिळताच आठवडाभरात अल्पमुदतीची निविदा काढली जाणार आहे. पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांवर पाच ते सहा इंच खोल खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी पालिका कंत्राटदारांच्या माध्यमातून पॅचवर्कचे काम करते. मात्र, यंदा पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असल्याने निविदा काढण्यात आल्या नाही.

तसेच त्यापूर्वी काढलेल्या निविदांना कंत्राटदारांकडून प्रतिसाद देखील मिळाला नव्हता. आता प्रशासक तथा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी हे खड्डे डांबराऐवजी पॉलिमर आधारित तंत्रज्ञानाने तातडीने बुजविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पुणे येथील एका कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे खड्डे बुजविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यामध्ये पॉलिमर आधारित साहित्याचा वापर होतो. हे काम पावसाळ्यात केले तरी पाण्याचा त्यावर तेवढा परिणाम होत नाही. त्याचे आयुष्यमानही दोन वर्षे इतके आहे. त्यामुळे आता प्रत्येक प्रभागनिहाय पावणे तीन लाख याप्रमाणे २६.५० लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai: कोणीही एकत्र येऊ द्या, जिंकणार फक्त आम्हीच: मंत्री शंभूराज देसाई; कितीही ताकद लावा, नेमकं काय म्हणाले?

अग्रलेख - हवे मनोमीलन जनतेशी

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ना तारण, ना जामीनदार द्यावा लागणार, तरी बॅंकेतून मिळणार २५ लाखांपर्यंत कर्ज, कोणती आहे योजना? वाचा...

वाचनाचा आधार

सोलापुरात कांद्याच्या भावात २५० रुपयांची घसरण! तीन दिवसांत १२४५ गाड्या आवक; आता प्रतिक्विंटल १२५० ते ३३०० रुपयांपर्यंत दर

SCROLL FOR NEXT