ccc sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : आठ दिवसात रुग्णसंख्या जाणार दोन हजारांवर!

शहरातील प्रत्येक घर बनेल ‘कोविड केअर सेंटर’

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या(third wave of corona) लाटेत येत्या आठ ते दहा दिवसात शहरात (aurnagabad corona update)किमान दोन हजार रुग्ण आढळून येतील. पण पहिल्या व दुसऱ्या लाटेप्रमाणे लॉकडाऊन नसेल. रुग्णांची वाढ लक्षात घेता अनेकांना घरीच उपचार घ्यावे लागतील. त्यामुळे ‘हर घर कोविड केअर सेंटर (covid care center)’ असेल, असा इशारा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय(astikkumar pandey) यांनी सोमवारी (ता. १०) दिला. शहरातील कोरोना संसर्गाबाबात सुरू असलेल्या उपाय-योजनांची माहिती देताना श्री. पांडेय म्हणाले, की सध्या वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे तिसरी लाट येईल असे मानले जात आहे.

चार दिवसात दहाचे १८७ रुग्ण झाले आहेत. याच गतीने रुग्णांची संख्या वाढत राहिली तर येत्या आठ-दहा दिवसात दोन हजार रुग्ण आढळून येतील. रुग्णवाढ आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारी परिस्थिती याबद्दलचे चित्र पुढील चार-पाच दिवसात स्पष्ट होईल. रुग्ण संख्या वाढत असली तरी दवाखान्यात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. गंभीर त्रास असलेल्या रुग्णांचे प्रमाण देखील कमी आहे. त्यामुळे रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यानंतरही महापालिकेने कोविड केअर सेंटर्स सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. घरीच राहणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातून इतर सदस्य देखील कोरोनाबाधित होऊ शकतात, पण त्यांना सौम्य लक्षणे असतील.

निर्बंध पाळावेच लागतील

रुग्णांची संख्या झपाट्याने वाढेल पण पूर्वीच्या दोन लाटेसारखे लॉकडाऊन होणार नाही. निर्बंध मात्र हळहळू वाढविले जातील. शासनाचे नियम सर्वांनी पाळले तर रुग्ण संख्या वाढीचा आलेख रोखता येईल. त्यामुळे निर्बंध व नियम पाळण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे, असे श्री. पांडेय म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: भारताला मिळालं ५ वं गोल्ड! नीरु ढंडाने एकाच दिवशी दोन पदकं जिंकून रचला इतिहास

Mumbai Protest: मुंबईत मातंग समाज आक्रमक! अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाच्या समर्थनात उग्र आंदोलन, पोलिसांचा लाठीचार्ज

Maharashtra Sugar Season 2026 : साखर कारखाने 15 ऑक्टोबरपूर्वीही सुरू करा, विरोध डावलून शासनाकडून परिपत्रक जारी; नवा संघर्ष पेटण्याची शक्यता

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Pune MLC Election: शिक्षक, पदवीधर’ची आजपासून रणधुमाळी ;दोन दिवसांत जागा वाटप; सहा ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT