औरंगाबाद: लिफ्ट मागण्याचा बहाणा करुन तिघा तरुणांनी दुचाकीस्वाराला बेदममारहाण करुन लुटल्याची घटना २९ फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास विजय नगर परिसरात घडली होती. प्रकरणात तब्बल तिन महिन्यांनी शुक्रवारी (ता.१२) रात्री आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले.
शेख इरफान शेख लाल (२५, रा. नुराणी मस्जीत, गारखेडा गाव) असे आरोपीचे नाव आहे. प्रकरणात विकास भारकड (२३, रा. वाडोण बुद्रुक ता. उदगिर जि. लातूर ह.मु. जयभवानी नगर) याने तक्रार दिली. तक्रारीनुसार, विकास बीएसएनएल कंपनीचे कार्ड विक्री करुन आपला उर्दनिर्वाह चालवतो. २९ फेब्रुवारी विकासने बीएसएनलचे कार्ड एका ग्राहकाला विक्री केले होते, मात्र कार्डला काही अडचण आल्याने ग्राहकाने विकासला फोन करुन तक्रार केली.
तक्रारीचे निवारण करुन विकास रात्री साडेअकरा वाजता दुचाकीने (क्रं. एमएच१७ यू ५८४७) शिवाजीनगर येथून विजयनगर कडे जात होता. त्यावेळी कालिका माता मंदिर दोन तिन मुले उभी होती. त्यातील एकाने लिफ्टचा बहाणा करुन विकासला अडवले. तर उर्वरित दोघांनी विकासला दुचाकीवरुन खाली पाडले व कारगिल मैदानेकडे नेत बेल्टने बेदम मारहाण केली.
तसेच त्याच्या बोटाचे नख हत्याराने कट करुन त्याच्या खिशातील रोख साडे चारशे रुपये, मोबाइल व दुचाकी बळजबरी हिसकावरुन नेली. प्रकरणात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन तब्बल तिन महिन्यांनी आरोपीला अटक केली
सोमवारपर्यंत पोलिस कोठडी
संशयिताला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीला सोमवारपर्यंत (ता.१५) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. कांबळे यांनी शनिवारी (ता.१३) दिले. सुनावणीदरम्यान सहाय्यक सरकारी वकील योगेश तुपे यांनी आरोपीच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना अटक करणे आहे. तसेच गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम, मोबाइल व दुचाकी जप्त करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.