Aurangabad News esakal
छत्रपती संभाजीनगर

हातातोंडाशी आलेला गहू जळून खाक, शेतकऱ्याची मेहनतीवर पाणी

एक एकरावर कष्टाने पिकवलेला गहू जळून खाक

कमलाकर रासने

महालगाव (जि.औरंगाबाद) : चोरवाघलगाव (ता.वैजापूर) येथील शेतकऱ्यांवर ऐन गहू काढणीच्या काळातच शिमगा करण्याची वेळ आल्याचे विदारक चित्र बुधवारी (ता.१६) पाहावयास मिळाले. तळहाताच्या फोडाप्रमाणे आणि हाततोंडाशी आलेला घास लेकरांप्रमाणे जपलेला भीमराज नाना मोईन या शेतकऱ्याचा गट क्रमांक ७१ वरील एक एकर गहू जळून खाक झाल्याची घटना चोरवाघलगाव शिवारामध्ये बुधवार दुपारी तीनच्या सुमारास घडली. शॉर्टसर्किटमुळे संपूर्ण गहू जळून खाक झाल्याने पंचक्रोशीत या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे. (One Acre Wheat Burned Due To Short Circuit In Vaijapur Taluka Of Aurangabad)

आग आटोक्यात आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. परंतु आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविणे अशक्य झाले. या भीषण अग्नी तांडवामध्ये शेजारी असलेल्या पिकांचेही होरपळून नुकसान झाले आहे. तलाठी यांनी पाहणी करून पंचनामा केला. (Aurangabad)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा बनली 'कमाईचा स्रोत'; शुल्कवाढीमुळे सरकारने ₹५० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला!

Pimpri Metro: मेट्रोचा पादचारी पूल अद्याप अपूर्णच; मोरवाडी चौकात संथगतीने काम, धोका पत्करून रस्ता ओलांडण्याची वेळ

Tata Motors: टाटा मोटर्सचा शेअर 40 टक्क्यांनी घसरला; शेअर बाजारात नेमकं काय घडलं?

Kolhapur Youth Accident : आयुष्याचा शेवट एका स्पीड ब्रेकरमुळे झाला, २४ सत्यजित बाबतीत घडलं विपरीत

Nashik Crime : भद्रकाली पोलिसांची मोठी कारवाई! १८ गुन्हे दाखल असलेल्या तडीपार सागर कुमावतला वणी गडावरून घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT