CoronaVirus Image
CoronaVirus Image 
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबादेतील घाटीत एक कर्मचारी पॉझिटिव्ह!

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (घाटी) येथील अधिष्ठाता कार्यालयातील एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या कार्यालयातील दहा जणांची चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्या सर्वांना होम क्वारंटाईन  करण्यात आल्याची माहिती बुधवारी (ता. २७) डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

डॉ. येळीकर यांनी माहिती देताना सांगितले की, त्यांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे दहा जणांची तपासणी करण्यात आली. यात तीन डॉक्टर, दोन स्टेनो, तीन चतुर्थ श्रेणी कर्मचारी, एक सुरक्षारक्षक, एका चालकाचा समावेश आहे. या सर्वांची कोरोना चाचणी निगेटिव्ह  आली. हे सर्वजण होम क्वारंटाइन झाले आहेत.

अधिष्ठातांचा पदभार डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे
अधिष्ठाता कार्यालयमध्ये कोरोना बाधित कर्मचारी आढळल्यानंतर हे कार्यालय बुधवारी (ता. २७) दुपारी बंद करण्यात आले. ते चार दिवसानंतर अर्थात सोमवारी (ता. २) उघडण्यात येणार आहे. याकाळात अधिष्ठातांचा पदभार उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्याकडे देण्यात आला आहे ते त्यांच्या कार्यालयातूनच कारभार पाहतील. अशी माहिती डॉ. कानन येळीकर यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT