सिल्लोड (जि.औरंगाबाद) : अपघातामुळे स्कॉर्पिओची झालेली दुरवस्था. मृत विशाल महाकाळ सकाळ
छत्रपती संभाजीनगर

थरार! सिल्लोडमध्ये वाहन चार पलट्या घेत उलटले; एक ठार,दोघे गंभीर

सचिन चोबे

सिल्लोड (जि.औरंगाबाद) : सिल्लोड (Sillod) शहरात मंगळवारी (ता.दहा) पहाटे दोन वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातामध्ये (Accident In Aurangabad) वाहनाने तीन, चार पलट्या घेत रस्त्याच्या कडेला ते फेकले गेले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिल्लोड शहरालगत असलेल्या भराडी फाटा येथून शहरात स्काॅर्पिओ (एमएच २० सीएस ४४२१) भरधाव वेगाने येत असताना वाहनाने तीन ते चार पलट्या घेतल्याने ते रस्त्याच्या कडेला फेकले गेले. यामध्ये विशाल डिगंबर महाकाळ (वय २६, रा.जयभवानीनगर, सिल्लोड) हा जागीच ठार झाला. तर रोहित सुखदेव गवते (वय २५), अनिकेत राजू गायकवाड (वय २३, दोघे रा.सिल्लोड) हे गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर जखमींना सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून पुढील उपचारासाठी औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) पाठविण्यात आले. घटनास्थळी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, कर्मचारी पंडित फुले, टी.बी.टारपे यांनी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांची सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT