Job Fair 
छत्रपती संभाजीनगर

महत्त्वाची बातमी: नोकरीची आलीय संधी, असा करा अर्ज

सुषेन जाधव

औरंगाबाद: भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसेस उपक्रमांतर्गत मॉडेल करिअर सेंटर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांच्यातर्फे राज्यभर तिसरा ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आठ जून ते १२ या कालावधीत सुरू राहणार आहे. 

१० मे रोजी आयोजित पहिल्या मेळाव्यात १६० उमेदवारांनी सहभाग दर्शविला. २१ ते २५ मे रोजी दुसऱ्या मेळाव्यात ३७१ जणांनी सहभाग नोंदविला होता. येत्या आठ जूनपासून सुरू होणाऱ्या मेळाव्यात विविध पदांसाठी ६२० जागांसाठी पदभरती होणार असल्याची माहिती समन्वयक डॉ. अनिल जाधव यांनी दिली. पदवीधर, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा, एमबीए आदी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. 

असा करा अर्ज 
उमेदवाराने www.ncs.gov.in या पोर्टलवर जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी, नंतर जॉबफेअर व इव्हेंट टॅबमधील Online ३rd Jobfair at Maharashtra, Osmanabad on ८th June'२०२० to १२th June'२०२०, ला क्लिक करून proceed किल्क करावे, त्यानंतर Personal information नंतर Next ला क्लिक करावे. More about your self नंतर Next ला किल्क करावे. जॉबफेअर डिटेल्समध्ये Annapurna Finance (P) Ltd ला क्लिक करावे.

त्यानंतर Field Credit Officer ला किल्क करावे. त्यानंतर आपले submit participation ला क्लिक करावे, जर उमेदरवार विहित पात्रता धारण करत असेल तर उमेदवारांची आठ ते १२ जूनदरम्यान कंपनीच्या प्रतिनिधीकडून टेलिफोनिक मुलाखत घेतली जाणार असल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले. समस्या असल्यास १८००-४२५-१५१४ या निःशुल्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे ही प्रक्रिया निःशुल्क असून, निवड झाल्यास लॉकडाउन संपल्यानंतर रुजू होता येणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT