opportunity for teachers to transfer convenient location District internal procedure followed before new recruitment
opportunity for teachers to transfer convenient location District internal procedure followed before new recruitment Sakal
छत्रपती संभाजीनगर

Chh. Sambhajinagar : सोयीच्या ठिकाणी बदलीची शिक्षकांना पुन्हा एक संधी; नवीन भरतीपूर्वी जिल्हाअंतर्गत प्रक्रिया राबवावी लागणार

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : आधी दूरवर फेकल्या गेलेल्या शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी बदली होण्यासाठी पुन्हा एक संधी मिळणार आहे. कार्यरत असलेल्या आणि बदलीसाठी इच्छुक असलेल्या शिक्षकांना त्यांच्या विकल्पानुसार रिक्त जागेवर समुपदेशाने बदलीची संधी देण्यात येणार आहे. ग्रामविकास विभागाने याबाबत आदेश जारी केला आहे. नवीन भरतीपूर्वी ही प्रक्रिया शिक्षण विभागाला राबवावी लागेल.

शासननिर्णय २१ जून २०२३ नुसार अशी संधी दिली जाणार आहे. सध्या नवीन शिक्षक भरती सुरू आहे. जे शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसाठी इच्छुक आहेत, त्यांच्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समुपदेशाद्वारे बदली प्रक्रिया राबवावी, अशी मागणी संघटनांकडून करण्यात आलेली आहे.

मात्र, शासन आदेशानुसार कार्यवाही होत नसल्याबाबतच्या अनेक लेखी व मौखिक तक्रारी प्राप्त होत आहेत. जिल्हा परिषदेअंतर्गत नियुक्त शिक्षकांच्या बदलीबाबतच्या सुधारित अटी ग्रामविकास विभागाच्या सहमतीने २१ जूनच्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या आहेत.

या आदेशानुसार बदलीबाबत आवश्यक ती कारवाई करण्याबाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना आपल्या स्तरावरून निर्देश देण्यात यावे, असे उपसचिव तुषार महाजन यांनी उपसचिव ग्रामविकास विभाग यांना कळविले आहे.

आता या पत्रावर ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने निर्देश देणे गरजेचे आहे. कारण शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत ग्रामविकास विभागाच्या आदेशाला अंतिम मान्यता आहे.

— राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ.

शिक्षक भरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांना इच्छुक ठिकाणी बदलीची संधी देण्यात आलेली आहे. शासनाच्या या निर्णयानुसार कार्यरत शिक्षकांना इच्छुक ठिकाणी बदलीची संधी दिल्यास ते ज्ञानार्जनाचे काम मन लावून करतील. याबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे.

— विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT