RTPCR
RTPCR Esakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : चाचणी पथकाला हुसकावले

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या ओमिक्रॉन विषाणूमुळे महापालिकेतर्फे विदेशातून आलेल्या नागरिकांची चाचणी केली जात आहे. पण महापालिकेच्या पथकाला गांधीनगरातून हुसकावून लावण्यात आले तर मोतावालानगरातही विरोध करण्यात आल्याचे शुक्रवारी (ता. तीन) समोर आले. याविरोधामुळे आरटीपीसीआर चाचणीसाठी स्वॅब न घेताच महापालिकेच्या पथकाला माघारी फिरावे लागले.

ओमिक्रॉन विषाणूमुळे दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने विमानतळ प्राधिकरणाकडून विदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती मागविली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने महापालिकेला दोन डिसेंबरला शहरात आलेल्या ३० जणांची यादी दिली होती. या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार महापालिकेने या प्रवाशांचा शोध सुरू केला. यादी तपासल्यानंतर ३० पैकी २९ जण महापालिका क्षेत्रातील असल्याचे व एक जण ग्रामीण भागातील असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार संबंधितांचे पत्ते आणि फोन नंबर घेऊन संपर्क साधला जात आहे. संपर्क झालेल्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. मोतीवालानगर येथे आरोग्य विभागाचे कर्मचारी गेले असता त्यांना नागरिकांनी येऊच दिले नाही. त्यामुळे पथकाला माघारी फिरावे लागले. असाच प्रकार गांधीनगरात घडला. गांधीनगरातून पथकाला हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे २९ पैकी ४ जणांचीच दिवसभरात चाचणी होऊ शकली, असे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांना अधिकाऱ्यांनी सांगितले. सिडको एन-३ भागातील एकाच्या घरी जावून त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

महापालिका करणार तक्रार

संसर्ग रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीसाठी जे नागरिक सहकार्य करणार नाहीत त्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार दिली जाईल असा इशारा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा यांनी दिला.

तपासणीला विरोध केल्यास गुन्हे

कोविडच्या नव्या ओमिक्रॉन विषाणुचा प्रसार टाळण्यासाठी प्रशासन कामाला लागले असून उपाययोजना राबवा अशा सक्त सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. परदेशातून शहर व जिल्ह्यात परतलेल्या नागरीकांची नियमानुसार कोविड चाचणी कराच पण त्यांनी तपासणीसाठी विरोध केल्यास गून्हे दाखल करा असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी या सुचना केल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ज्या भागात लसीकरण कमी आहे तेथील नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे. हातगाडी चालक, दुकानदार यांच्या लसीकरण करण्यावर अधिक भर द्या असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT