Increase private centers; Speed ​​of vaccination is required to prevent corona 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाला रोखण्यासाठी ग्रामस्थ शेतात, वीजपुरवठा करण्याची मागणी

वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता गावातील नागरिकच पुढाकार घेत आहेत. अनेक नागरिकांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

उस्मानाबाद : ग्रामीण भागात कोरोना (Covid In Rural) शिरकाव वाढत असल्याने अनेक नागरिक गावातून शेतात राहण्यासाठी जात आहेत. त्यामुळे शेतात सिंगल फेज वीजपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ हजार ६९८ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. रोज सहाशे ते आठशे रुग्ण आढळून येत आहे. गेल्या १० दिवसांपासून बाधित रुग्णांची संख्या स्थिर आहे. कधी ६०० तर कधी ८०० रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, यामध्ये वाढ होत नसल्याने समाधानाची बाब आहे. दरम्यान, गेल्या १० दिवसांपूर्वी उस्मानाबाद (Osmanabad) शहरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. पण, सध्या शहरातील संख्या कमी झाली असली तरी ग्रामीण भागात याचा फैलाव वाढत आहे. प्रामुख्याने कळंब (Kalamb), भूम (Bhoom) आणि उमरगा (Umarga) या तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. (Osmanabad Latest News Villagers Stay At Field For Preventing Corona)

यामध्ये तालुक्याच्या ठिकाणापेक्षा गावातील रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता गावातील नागरिकच पुढाकार घेत आहेत. अनेक नागरिकांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. संसर्ग होऊ नये, यासाठी दिवसभर शेतात जाणे असा पर्याय निवडला जात आहे. याशिवाय काही नागरिक तर शेतात राहण्यासाठी गेले आहेत. मात्र, अशा नागरिकांना सध्या विजेच्या लपंडावाला सामोरे जावे लागत आहे. शेतात सध्या आठच तास वीजपुरवठा मिळत आहे. बहुतांश तालुक्यात अशीच स्थिती आहे. मात्र, काही तालुक्यातील काही भागात २४ तास सिंगलफेज वीजपुरवठा केला जातो. यामुळे शेतात जाऊन राहणाऱ्यांना कोरोनाचा धोका अगदीच कमी असल्याचे दिसून येत आहे. गावातील किमान १० टक्के नागरिक सध्या शेतात राहण्यास प्राधान्य देत आहेत. यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात केवळ आठ तासच वीजपुरवठा राहत आहे. उर्वरित वेळेत मात्र अंधारात चाचपडत काम करावे लागते.

रात्रीच्या वेळेत मच्छर

काही वेळा शेतात वीज दिवसा असते. अशा वेळी सिंगलफेज वीजपुरवठा रात्री नऊ ते १० च्या सुमारास सुरू होतो. त्यामुळे बहुतांश भगिनींना अंधारात चाचपडत स्वयंपाक उरकावा लागतो. तर जेव्हा थ्री-फेज वीजपुरवठा रात्रीचा असतो. अशा वेळी रात्रीच वीज ट्रीप होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात. त्यामुळे झोपेचा तर खोळंबा होतोच. शिवाय पंखे बंद पडल्याने डासांचा चावा मोठ्या प्रमाणात सुरू होतो. यातून मार्ग काढण्यासाठी शेतातील सर्वच ठिकाणी २४ तास सिंगल फेज विद्युत पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: भारतीय खेळाडूंना पाकिस्तानविरुद्ध जबरदस्तीने खेळावं लागलं, BCCI...; दिग्गज खेळाडूचा खळबळजनक दावा

Akola News : बंजारा व लभाण समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देवू नका; अकोल्यात बिरसा क्रांती दलतर्फे जिल्हा कचेरीवर भव्य मोर्चा

Latest Marathi News Updates : भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना अटक

Kej Heavy Rain : केज तालुक्यात पावसाचा हाहाकार! नदी-नाल्यांच्या पाण्याने केले उग्र स्वरूप धारण, केकाणवाडी पाझर तलाव फुटला

Supreme Court warn Election Commission : बिहार 'SIR'वरून सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिला इशारा अन् म्हटलं...

SCROLL FOR NEXT