Aurangabad Crime News 
छत्रपती संभाजीनगर

नोटाबंदीचा फुसकाबार, जुन्या पाचशे रुपयांच्या नोटा बदलणाऱ्या एकाला पोलिसांनी पकडले

दिनेश शिंदे

चितेपिंपळगाव (जि.औरंगाबाद) : चलनातून बाद झालेल्या पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बदली करण्याच्या उद्देशाने निपाणी (ता.औरंगाबाद) शिवारात आलेल्या एका जणाला चिकलठाणा पोलिसांनी शिताफीने अटक करुन त्यांच्याकडील पाचशे रुपयांच्या ४०० शे नोटा जप्त करुन त्याला ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी (ता.नऊ)  सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास करण्यात आली.

या बाबत चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निपाणी शिवारात मंगळवारी गणेश मच्छिंद्र राठोड (वय २७, रा.डोणगाव तांडा, ता.पैठण, हल्ली मुक्काम देवळाई परिसर, औरंगाबाद) हा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील निपाणी शिवारातील व्हिडिओकॉन कंपनीजवळ हरियाणा राजस्थान हॉटेलसमोर चलनातून बाद झालेल्या जुन्या पाचशेच्या दोन लाख रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्यामार्फत मिळताच चिकलठाणा पोलिसांनी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास सापळा लावुन येथील हरियाणा राजस्थान हॉटेल समोरून ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या ४०० नोटा (दोन लाख रुपये), एक रेडमी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट (दहा हजार रुपये किमतीचा) व एक हिरो कंपनीची मोपेड दुचाकी विना क्रमांक (किंमत 40 हजार रुपये) असा एकूण अडीच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याला अटक केली. चिकलठाणा पोलिस ठाण्यात पोलिस नाईक रविंद्र साळवे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पाटील, अजित शेकडे, रवींद्र साळवे, सोपान डकले, दीपक सुरोशे, संतोष टिमकीकर, अण्णा गावंडे आदींनी केली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT