corona vacine sakal
छत्रपती संभाजीनगर

लस न घेतलेले तब्बल एक हजारावर नागरिक पॉझिटिव्ह

महापालिकेच्या वॉररूममधून चौकशी; अनेक जण होम आयसोलेशनमध्येच

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गेल्या काही महिन्यांपासून लस घेण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. पण अद्याप अनेकांनी लसीचा एकही डोस घेतलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. यातील तीन हजार ३४० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी महापालिकेच्या वॉर रूममधून काळजी घेतली जात आहे. वॉररूममधून संपर्क साधण्यात आलेल्या रुग्णांपैकी तब्बल एक हजार ७५ जणांनी लसीचा एकही डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे.

शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या वीस दिवसांत सुमारे सहा हजार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान अनेकांना तीव्र लक्षणे नसल्याने होम आयसोलेशनमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेच्या वॉररूममधून होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांशी दिवसांतून तीनवेळा संपर्क साधला जात असून, त्यासाठी वॉररूममध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन दिवसांपूर्वी होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या तीन हजार ३४० रुग्णांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. त्यात लस घेतली आहे का? असा प्रश्‍नही रुग्णांना करण्यात आला असता दोन हजार ४४ रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याचे सांगितले तर लसीचा एक डोस घेतलेला आहे, असे २२१ जणांनी सांगितले. एक हजार ७५ जणांनी लसीचा एकही डोस घेतलेला नसल्याचे सांगितले.

लस घेतलेल्यांना धोका कमी

यासंदर्भात महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले की, लस घेतल्यानंतरही कोरोना संसर्ग झाला तरी अशांना जास्त त्रास होत नाही. मात्र लस घेतलेली नसेल तर धोका अधिक आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी लस घेतलेली नाही, त्यांनी लस घेणे गरजेचे आहे, असे डॉ. मंडलेचा यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT