Paithan News
Paithan News 
छत्रपती संभाजीनगर

कोरोनाची भीती : पैठणच्या नाथषष्ठी यात्रेबाबत मोठा निर्णय...

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : कोरोना व्हायरसची साथ पसरू नये, म्हणून पैठण येथील श्री एकनाथ षष्ठी महोत्सव स्थगित करण्याचा निर्णय मंगळवारी (ता.10) जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. १५ दिवस चालणाऱ्या या नाथषष्ठी महोत्सवासाठी राज्यभरातून तब्बल ७ ते ८ लाख भाविक हजेरी लावतात.

विभागातील यात्रा महोत्सवांबाबत त्या-त्या जिल्हा प्रशासनाने निर्णय घेण्याचे निर्देश सोमवारी (ता.9) विभागीय आयुक्तांनी बैठकीत दिले होते. श्री एकनाथ षष्ठी महोत्सव समितीने पैठण येथे बैठक घेऊन यात्रा नियोजित वेळेवर घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांनी पैठण येथील यात्रा उत्सव स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर मराठवाड्यातील नाथषष्ठीसह धार्मिक उत्सव, यात्रासह मोठे कार्यक्रम रद्द करण्यात यावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त कार्यालय प्रशासनाने संबधितांना केलेल्या आहेत. या अनुषंगाने सोमवारी (ता.९) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. याबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांसाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र २ कोटी रुपयांचा निधी राखून ठेवावा, तसेच तत्काळ हेल्पलाईन सुरु करावी, असे आदेश आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिलेले आहेत. 

आपल्याकडे काही होऊ नये, यासाठी 

देशभरात कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. शासकिय पातळीवर काय करावे, यासाठी सोमवारी श्री. केंद्रेकर यांच्या दालनात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, मनपाचे आरोग्य अधिकारी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक झाली.

आपल्याकडे काही होऊ नये, यासाठी पूर्वतयारी सुरु असून जनजागरण करण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे उत्सवाच्या ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकत्र येऊ नये, असे जास्तीत जास्त नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सुरु करायला सांगितले आहे. प्रत्येक मेडिकल कॉलेज सिव्हील सर्जन, तालुका आणि या शहराच्या मुख्य भागात हेल्पलाइन व्यवस्थितरित्या जनजागरण करेल. प्रशासनामार्फत रेल्वेस्टेशन, विमानतळ अशा महत्वाच्या ठिकाणी सुद्धा काळजी घेतली जावा, अशा सुचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत.

आदेशात म्हटले आहे की,...  

याबाबत मंगळवारी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या स्थगिति आदेशात म्हटले, की पैठण येथील नाथषष्ठी महोत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने येतात मात्र, जगभरात 105 देशात कोरोना या आजाराने अंदाजे 3817 लोक दगावले, तर आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. भारतातही 43 लोकांना या आजाराची लागण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ही आकडेवारी देखील जाहीर केली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय योजना 5 मार्च 2020 च्या मार्गदर्शकीमध्ये दिलेले आहेत.

त्यामुळे पैठण येथील महोत्सवात राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या आरोग्याची काळजी लक्षात घेऊन हा स्थगितीचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जर यात्रेमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आला तर संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आजारावर अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिबंधित उपचार किंवा लस उपलब्ध नाही. त्यामुळे जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये तसेच जीवित हानी होऊ नये, या दृष्टीने सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून मुंबई पोलीस कायदा 1991 चे कलम 43 अन्वये आपल्याला असलेल्या अधिकारात विशेष उपाययोजना करण्याच्या दृष्टीने या महोत्सवात स्थगिती देण्यात येत आहे, असे म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT