Pankaja-Munde-in-Tears
Pankaja-Munde-in-Tears Sakal
छत्रपती संभाजीनगर

उमेदवारी नाकारल्याने पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा राडा; पोलिसांची धरपकड

दत्ता लवांडे

औरंगाबाद : सध्या विधानपरिषदेच्या निवडणुकासांठी रणधुमाळी चालू असताना पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी औरंगाबादेत राडा केला आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने आपले पाच उमेदवार उभे केले आहेत. त्यामध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना वगळण्यात आलं आहे त्यामुळे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान त्यांनी औरंगाबादेच्या भाजप (BJP) कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केलं आहे. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.

(Pankaja Munde Suporters Protest At Aurangabad)

दरम्यान भाजपने पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारल्याने जळगावमध्येही आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता औरंगाबादमध्ये कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर आंदोलन करत भाजपविरोधात घोषणाबाजी केली आहे. पंकजा मुंडे यांना सातत्याने डावललं जातंय असं मत समर्थकांनी व्यक्त केलं आहे.

"भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली नाही, तर आता येत्या निवडणुकांत ओबीसी समाज भाजपला उत्तर देणार आहे." असं मत समर्थकांनी व्यक्त केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान परभणीतही सोशल मीडियावर पंकजा मुंडे यांची उमेदवारी नाकारल्यावरून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.

पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली असून यासंदर्भात २ दिवस कोणतीच भूमिका माध्यमांसमोर मांडणार नसल्याचं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT