Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यातील रुग्णांना ‘या चार’ रुग्णालयात मिळणार मोफत उपचार

राजेभाऊ मोगल

औरंगाबाद : येथील शेठ नंदलाल धूत, कमलनयन बजाज, एमजीएम आणि डॉ. हेडगेवार ही चार रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत समाविष्ट आहेत. योजनेच्या यावर्षीच्या नवीन करारा संदर्भात या रुग्णालयांच्या काही हरकती व शंकांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी निरसन करून रुग्णालयांना योजनेंतर्गत उपचार देण्याविषयी आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शनिवारी (ता. नऊ) झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे आता मराठवाड्यातील सामान्य जनतेला मोफत उपचार मिळू शकतील. 

औरंगाबादला कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी शनिवारी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी एमजीएम रुग्णालयाला भेट दिली. तेथील व्यवस्थापन अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी शहरातील प्रमुख रुग्णालयांच्या व्यवस्थापन प्रमुखांसमवेत बैठक घेतली. शहरातील धूत, बजाज, एमजीएम, डॉ. हेडगेवार ही मोठी रुग्णालये राज्य शासनाच्या महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी होते. मात्र, यावर्षीच्या नवीन कराराबाबत या रुग्णालयांच्या काही हरकती, शंका होत्या. त्यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी या हरकती आणि शंकांचे निरसन केले आणि रुग्णालयांना आश्वासित करतानाच सुधारित करारानुसार नागरिकांना उपचार देण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत यावेळी करारावर रुग्णालय व्यवस्थापनाने स्वाक्षऱ्या केल्या. त्यानुसार आता या चार रुग्णालयांच्या माध्यमातून सामान्यांना उपचार मिळू शकतील. या बैठकीस खासदार भागवत कराड, एमजीएम हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सूर्यवंशी, डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे डॉ. तुपकरी, डॉ. पांढरे, धूत हॉस्पिटलचे डॉ. गुप्ता, बजाज हॉस्पिटलचे डॉ. श्रीवास्तव, डॉ. पठाण उपस्थित होते. 


आता सिझेरियन प्रसूतीचाही समावेश 
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये राज्यातील १,००० रुग्णालयांचा समावेश आहे. यापूर्वी बाळंतपण आणि सिझेरियन खासगी रुग्णालयात होत नव्हते. आता या योजनेंतर्गत त्याचाही समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना खासगी रुग्णालयांकडून आकारण्यात येणाऱ्या अवाजवी दराला चाप लावण्यासाठीही महत्त्वाचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सागितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ujjain Shahi Masjid: मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळली! उज्जैनची शाही मशीद पाडण्यास स्थगिती देण्यासाठी उच्च न्यायालयाचा नकार

‘राइज अँड फॉल 2’मध्ये मोठा राडा! शहजाद पूनावालांशी सिवेत तोमरचं जोरदार भांडण; धक्का दिला, कपडेही फाडले, धक्कादायक व्हिडिओ समोर

Ferritin Test: ‘नॉर्मल’ हिमोग्लोबिनमुळे गाफील राहू नका! ‘फेरिटिन’ टेस्टही आहे तितकीच महत्त्वाची

Latest Marathi News Live Update: सोलापूर शिवसेना सोशल मीडिया जिल्हा कार्यकारिणी जाहीर

WPL 2027 Retaintion Full List: गुजरातने तब्बल १५ खेळाडूंवर दाखवला विश्वास, तर RCB-MI संघात कर्णधारांसह प्रमुख खेळाडू रिटेन

SCROLL FOR NEXT