Aurangabad News 
छत्रपती संभाजीनगर

तोबा तोबा! औरंगाबादेत झाली पोलिस यंत्रणाही हतबल

प्रकाश बनकर

औरंगाबाद : संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन, पोलीस विविध उपाययोजना करीत आहे. असे असतानाही नागरिकांना कुठलेच  गांभीर्य राहिले नाही. जुन्या मोंढ्यात खरेदी करण्यासाठी बुधवारी (ता.६) दोन ते तीन हजारांहून अधिक लोक एकाच वेळी खरेदीसाठी आले होते.

पुरेसा साठा असतानाही गर्दी करू नका, असे वारंवार सांगूनही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी एवढी प्रचंड होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती. यामुळे पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला.

एप्रिल आणि मे महिन्यात वर्षभराचे धान्य खरेदी जुन्या मोंढ्यातून करण्यात येते. आजपासून सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत किराणा, धान्य मार्केट सुरू ठेवण्यात आले होते. लोक वर्षभराची खरेदी करण्यासाठी जुन्या मोंढ्यात गर्दी करत आहेत. मंगळवारी पोलिस प्रशासनातर्फे जुन्या मोंढ्यात वाहनांना आणण्यास बंदी घातली आहे. यासाठी मोंढ्यात येणाऱ्या जवळपास सर्व रस्त्यांवर बॅरिकेट लावण्यात आले आहे. 

पोलीसही हतबल

जुन्या मोंढ्यातील  गर्दी कमी व्हावी यासाठी क्रांती चौक पोलिसांतर्फे जाफरगेट, मोती कारंजा, मुख्य रस्त्यावर बॅरिकेड्स लावून वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला,मात्र हे सर्व नियम नागरिकांनी तोडले. यामुळे पोलिसही आज हतबल झाले होते.

किराणा व धान्य याचा पुरेसा साठा जिल्ह्यात आहे, व्यापाऱ्यांकडे आहे. खरेदीसाठी गर्दी करू नका, असे आवाहन व्यापारी व प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात आले होते, मात्र नियमाच्या विरुद्ध जाण्याची प्रथा औरंगाबादकरांनी यावेळी पाळली व नियमित होणाऱ्या गर्दीपेक्षा जास्त गर्दी खरेदीसाठी जुन्या मोढ्या झाली.

अनेकांनी दुचाकी, तर काहींनी रिक्षा लोडींग या बाजारपेठेत आणत पोलीसांनाच चॅलेंज केले. अनेकांनी मास्क घतलेले नव्हते. धान्य, तसेच किराणा दुकानातील कामगार, हमालांनीही मास्क घातलेले नव्हते. यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता जास्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Jewellery: सोन्याचे दागिने महागणार? हॉलमार्किंग शुल्कात तब्बल 67% वाढ; बिल किती वाढणार?

Ajit Agarkar च्या जागी कोण? रोहित शर्माशी पंगा महागात पडला, BCCI ने शॉर्टलिस्ट केली दोन नावं, दोघांचेही मुंबई इंडियन्सशी कनेक्शन

सव्वा पायलीचा भात, नऊ भाज्या आणि... माहेरवाशीण नाही बांदेकरांकडे सुना बसवतात गौरी, पूजा बिरारी म्हणते-

गोरं होण्यासाठी औषधांचं अतिसेवन बेतलं जीवावर? डोळ्यातून रक्त, मृतदेह पालथा; २२ वर्षीय BAMS डॉक्टरच्या मृत्यूने अमरावतीत खळबळ

Latest Marathi News Update : आम्ही ECI च्या विवेकाधिकाराची जागा घेऊ शकत नाही - सुप्रीम कोर्टाचं महत्वाचं निरीक्षण

SCROLL FOR NEXT