prices hike prices hike
छत्रपती संभाजीनगर

Petrol price: खाद्यतेलापाठोपाठ पेट्रोलही शंभरच्या घरात

पेट्रोल १०० रुपये लिटर तर डिझेल ९१.४१ पैसे

प्रकाश बनकर

औरंगाबाद: गेल्या दिवाळीनंतर शंभरच्या आत असलेल्या खाद्यतेलांच्या किंमती शंभरी पार गेल्या. त्याच प्रमाणे शहर आणि जिल्ह्यात पेट्रोलचे दर हे शंभर रुपयांवर गेले आहेत. काही पंपांवर शुक्रवारी (ता.१४) पेट्रोल ९९.९४ रुपये तर काही ठिकाणी १०० रुपये लिटरने विक्री झाले. त्यापठोपाठ आता डिझेलचीही वाटचाल शंभरीकडे सुरु आहे. औरंगाबादमध्ये शनिवारीही (ता. १५) पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर विक्री होत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात येत्या काही दिवसात आणखी वाढ होणार असल्याची शक्यता पंपचालकांनी व्यक्त केली आहे.

शहरात गेल्या चोवीस तासात पेट्रोलच्या दरात २५ तर डिझेलच्या दरात ३६ पैशांची वाढ झाली आहे. ही दरवाढीमुळे शंभरच्या आत असलेल्या पेट्रोलने शतकाचा आकडा गाठला आहे. शहरातील वेगवेगळ्या पंपावर किंमती वेगवेगळ्या होत्या. काही ठिकाणी शंभर रुपये होत्या. तर काही ठिकाणी ९९.९४ रुपये किंमत होती.

कोविडमुळे यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे, असे पेट्रोलियम असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT