Aurangabad petrol pump Aurangabad petrol pump
छत्रपती संभाजीनगर

'औरंगाबादमध्ये आजपासून पेट्रोलपंप अकरापर्यंतच सुरु ठेवणार'

पेट्रोलपंपाला २५ हजाराचा दंड लावल्याने असोसिएशनचा निर्णय

प्रकाश बनकर

औरंगाबाद: सिडको एन-१ येथील सरदार सिंग ॲण्ड सन्स पेट्रोलपंपाला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या नियमाचे उल्लंघन केल्याने शुक्रवारी (ता.२१) २५ हजार रुपयांचा दंड केला. दुपारी एकपर्यंत पेट्रोलपंप सुरु ठेवण्याचा नियम असताना आणि नेमके कोणत्या नियमाचे उल्लंघन झाले याची स्पष्टता न करताच ही कारवाई करण्यात आली. यामुळे शनिवारपासून (ता.२२) केवळ ७ ते ११ याच वेळेतच शहरातील पंप सुरु राहतील. त्यानंतर पंप बंद ठेवण्याचा निर्णय पेट्रोलियम-डिलर असोसिएशनतर्फे घेण्यात आल्याची माहिती असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास यांनी दिली.

या कारवाईविषयी असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाविषयी अखिल अब्बास म्हणाले की, आज सरदार सिंग ॲण्ड सन्स पंप चालकावर कोविड नियमांचे उल्लंघनप्रकरणी २५ हजारांचा दंड लावण्यात आला. मुळात ही कारवाई ११ वाजेदरम्यान करण्यात आली. यात नेमका कोणत्या नियमाचा भंग केला, त्याचा उल्लेख दंडाच्या पावतीत नाही. १७ एप्रिलला दिलेल्या नियमावलीत पेट्रोल पंप एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एक वाजेनंतर केवळ अत्यवाश्‍यक सेवांना सूट आहे. हा दंड एक वाजेपूर्वीच करण्यात आला आहे. यामुळे जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी पंप सुरु ठेवण्याची निश्‍चीत वेळ सांगावी. गर्दी होऊ नये यासाठीची आम्ही काळजी घेत कोणताही गोंधळ होऊ देत नाही. यामुळे अशा प्रकारे कारवाई होत असेल तर, आम्ही ११ वाजेपर्यंतच पंप सुरु ठेवू.

आम्ही सर्व नियम पाळत आहोत. आमच्याकडे ११ वाजेनंतर कोण इंधन भरते याचे रेकॉर्ड तयार आहे. या कारवाईत नेमका कशाचा भंग केला ते स्पष्ट करावे. पंप सुरु ठेवण्याची वेळ निश्‍चित करावी. शनिवारपासून आम्ही केवळ ११ वाजेपर्यंत पंप सुरु ठेवणार आहोत.
-अखिल अब्बास, सचिव, पेट्रोल डिलर असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! T20 World Cup साठी संघात निवड झालेल्या खेळाडू ICC कडून निलंबित; मॅच फिक्सिंगचे आरोप

Accident News: स्लीपर बस आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात! ४ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये माय-लेकराचा समावेश; काही प्रवाशी जखमी

Horoscope: लवकरच होतोय शुक्र उदय! 4 राशींना मिळेल अमाप पैसा; अनपेक्षित गुड न्यूज, कामामध्ये मोठं यश, दिवाळीपर्यंत चमकत राहील भाग्य

Pune Water Supply: पुणे शहरात अनेक ठिकाणी पाणी पुरवठा बंद; 'या' भागातल्या जलवाहिनीचं काम सुरु

Malegaon News : मालेगावच्या प्रगतीचा 'पॉवरफुल' आधारवड कोसळला; यंत्रमाग, शेती अन् सिंचनासाठी दादांनी उघडली होती तिजोरी

SCROLL FOR NEXT