election sakal
छत्रपती संभाजीनगर

Aurangabad : बाजार समितीवर प्रशासकीय मंडळाच्या हालचालींना वेग

फुलंब्री : भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा असणार समावेश

नवनाथ इधाटे

फुलंब्री : फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपल्याने बाजार समिती सध्या प्रशासक राज सुरू आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याने भाजप आणि शिंदे गटात नवचैतन्य निर्माण झाले आहे. त्याच धर्तीवर फुलंब्री बाजार समितीवर पदाधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्यकारी मंडळ लवकरच येणार असल्याची शक्यता आहे. यासाठी भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे.

फुलंब्री बाजार बाजार समितीचा कार्यकाळ संपलेला होता. मात्र कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर संचालकांना मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु आता ही मुदत वाढही संपली असून या बाजार समितीवर प्रशासक राज सुरू आहे. सहकार निबंधक विभागाचे विष्णू रोडगे सध्या प्रशासक पदाचा धुरा सांभाळत आहे. येथील बाजार समिती २०१५-१६ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना या महाविकास आघाडीचे वर्चस्व होते. यात बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेस पक्षाचे संदीप बोरसे यांनी पदभार स्वीकारला होता.

मात्र, कालांतराने दुसऱ्या सहकाऱ्याला सभापती करण्यासाठी बोरसे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या डावपेच्या शिवसेनेने संधी साधून चंद्रकांत जाधव हे शिवसेनेचे पहिले सभापती म्हणून विराजमान झाले होते. कालांतराने कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ संपला आणि कोरोना सुरू असल्याने संपूर्ण विभागाच्या निवडणुकीवर निर्बंध आलेले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने सर्वच निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

त्यामुळे याचा फायदा फुलंब्री बाजार समितीच्या संचालकांना झाला होता. परंतु ऑगस्ट महिन्यात समितीला दिलेली मुदतवाढही संपल्यामुळे सध्या प्रशासक आहेत. बाजार समितीच्या निवडणुका या जानेवारी २०२३ मध्ये घेतल्या जाणार असल्याने या तीन महिन्याच्या काळात कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय कार्यकारी मंडळ आणण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. यात प्रामुख्याने भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची या प्रशासकीय कार्यकारी मंडळात समावेशासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे.

मुख्य प्रशासक भाजपचा होण्याची शक्यता

फुलंब्री येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकीय कार्यकारी मंडळ येणार असून यात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा सहभाग असणार आहे. मात्र, यात भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक पदाधिकारी प्रशासकीय सदस्य म्हणून असणार असून मुख्य प्रशासक हा भाजपचा होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे या पदासाठी शिंदे गटानेही फिल्डींग लावल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सलग आठव्या दिवशी शेअर बाजार घसरला; सेन्सेक्स 100 अंकांनी खाली, कोणत्या शेअर्समध्ये विक्री?

Eknath Shinde: राज्यात पूरस्थितीचे संकट मोठे, शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Latest Marathi News Live Update: नालासोपारा पूर्वेमधील कपड्यांच्या दुकानाला लागली आग

TCS Layoffs: 'टीसीएस'मध्ये खरंच किती कर्मचाऱ्यांची कपात झाली? 12000 की 60000?

Ravindra Mangave : कारभारातील नाराजीमुळे अध्यक्ष ललित गांधींचा राजीनामा; रवींद्र माणगावे प्रभारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT