marriage  sakal
छत्रपती संभाजीनगर

औरंगाबाद : आता वाजवा रे वाजवा...पण अंतर राखून

लग्नातून हरवलेले बॅंडचे सूर पुन्हा कानावर पडणार दोन डोस घेतलेल्या वाजंत्रीलाच बॅंड पथकात परवानगी

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लग्न समारंभातील (marriage Function) गर्दीला संख्येचे बंधन घालण्यात आले होते, त्यामुळे बॅंडबाजाच बंद झाला होता. मात्र कोरोना (Corona Rules)नियमांचे पालन करून आणि दोन डोस घेतलेल्या वाजंत्रीला बॅंड पथकात सहभागी होण्याची परवानगी मिळाल्याने लग्न समारंभातुन कोरोनामुळे हरवलेले सूर पुन्हा कानावर पडणार आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (District Disaster Management) प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

कोरोनामुळे बॅंडपथकांवर निर्बंध घालण्यात आले होते, यामुळे यावर अवलंबून असणाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला होता. आता लसीकरण मोठ्या प्रमाणात झालेले असल्याने बॅंडपथकांच्या परवानगीबाबत प्रशासनाकडून फेरविचार करण्यात आला. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकरी सुनिल चव्हाण यांनी आदेश जारी केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, सध्या लग्न कार्य व इतर मंगलकार्यांचा काळ आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या ९ जानेवारी २०२२ च्या आदेशातील नियमावलीनुसार लग्न समारंभ व इतर अनुषंगिक कार्यक्रम, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नियम लावण्यात आले आहेत. त्यानुसार अशा कार्यक्रमात गर्दी होऊ नये यासाठी निर्बंधांचे पालन करावे. तसेच यासाठी बॅंड पथकातील वादक कलाकारांच्या रोजीरोटीचा विचार करून काही निर्बंधांसह बॅंड पथकांना परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत आदेश

  • लग्न सोहळे व इतर सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या ठिकाणी बॅंड वाजवणाऱ्या पथकात ज्यांचे दोन्ही डोस पुर्ण झाले आहेत तेच वाजंत्री सहभागी होऊ शकतील.

  • लसीकरणाचे दोन्ही डोस पुर्ण झालेल्या वाजंत्रींनाच बॅंड पथकात प्रवेश देण्याची संपुर्णत: जबाबदारी बॅंड व्यवस्थापक, मालकाची राहील.

  • लग्न समारंभाच्या बाहेर सुरक्षित अंतर राखून बॅंडचे सादरीकरण करावे.

  • बॅंड पथकासाठी सादरीकरणावेळी बॅंड मालकाने थर्मल स्कॅनर, सॅनेटायझरची व्यवस्था करावी.

  • मास्क, सॅनिटायझर, सहा फूट अंतर आणि आवश्‍यकेतेनुसार फेसशिल्ड वापरणे आवश्‍यक.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT